विविध मागण्यासाठी दीव्यांग समितीचे तहसीलदारांना निवेदन.

विविध मागण्यासाठी दीव्यांग समितीचे तहसीलदारांना निवेदन.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब**

दिव्यांग संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश हरिभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग समितीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दि. 22फेब्रुवारी रोजी तहसिलदर यांना दिले असून याबाबत मागण्या पूर्ण न झाल्यास या संदर्भात कुठलाही पत्र व्यवहार न केल्यास दि.25फेब्रुवारी पासून जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर काढण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.

दिव्यांग व्यक्तीचे हक्क व अधिकार २०१६ च्या अधिनियमाची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात यावी करीता संजय गांधी निराधार दर महा मिळत नसून दर महा देण्यात यावा,दिव्यांग कुटुंबामधून वेगळे शिधा पत्रिका करत असून असा एकट्या दिव्यांगाना शिधा पत्रिका देण्यात येण्याकरिता शासनाने शासन निर्णयामध्ये तरतूद करावी, जातीची अट न ठेवता केवळ दिव्यांग प्रमाणपत्रावर दिव्यागणा घरकुल योजना देण्याचे शासनाने शाषण निर्णयामध्ये तरतूद करावी.

दिव्यांग कुटुंब प्रमुखाला घरघुती ग्यास सिलेंडर भराईमध्ये ५०% सवलत देण्यात यावे. दिव्यांग कुटुंब प्रमुखाला दर महा विद्युत बिलामध्ये ५०% सूट देण्यात यावी, वोटिंग मशीन बदलवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे असे निवेदनात मागण्या आहे.ओमप्रकाश कांबळे जिल्हाध्यक्ष, शकीब सिद्दीकी, तालुका अध्यक्ष सलीम कुरेशी,महादेव पडघान सोनिया भगत रजिया सिद्दीकी आदी दिव्यांग निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 6 =