Dindayal Sparsh Yojna : विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये जमा होण्याची झाली सुरुवात !

Dindayal Sparsh Yojna : भारतीय पोस्टल विभागाकडून इयत्ता 6 ते 9 वी मधील विद्यार्थ्यांसाठी 6000 रुपये देण्याची सुरुवात केली आहे.Dindayal Sparsh Yojna च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करणे सुरू झाले आहे. टपाल विगाकडून ही स्कॉलरशिप योजना राबविण्यात येत असून,याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना नेमक काय करावे लागेल, याची माहिती आपण जाणून घेऊया….

भारतीय पोस्ट विभागाकडून दीनदयाल स्पर्श योजना “Dindayal Sparsh Yojna” सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रतिमाह 500 रुपये प्रमाणे एका वर्षात 6000 हजार रुपये बँक खात्यातून मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना भारतीय पोस्ट विभागाच्या संग्रह करून त्याचा कॅटलॉग बनवावा लागणार आहे.या योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना यानंतर योजनेतून स्कॉलरशिप मधून वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Dindayal Sparsh Yojna : विद्यार्थ्यांना हे करावे लागेल.

दीनदयाल योजनेसाठी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येतात. विद्यार्थ्यांना यासाठी विभागाकडून वेळी जारी करण्यात आलेले जुने टपाल तिकीट शोधून त्यांचे जतन करून, आणि त्यानंतर त्याच्या प्रदर्शन करावा लागणार आहे.

यासाठी टपाल तिकिटावर संशोधन करणे सुद्धा महत्त्वाचे राहणार आहे. असे विविध प्रकारचे छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना महत्त्वाची असून अशा विद्यार्थ्यांची या योजनेत निवड करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे,तसेच जे विद्यार्थी छंद म्हणून विविध काळातील टपाल तिकिटांचा संग्रह करतात आणि त्यांचा अभ्यास करून संशोधन करतात,अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप योजना पोस्ट विभागाकडून सुरू करण्यात आली असून,यात विद्यार्थ्यांना आर्थिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

भारतातून 920 विद्यार्थ्यांची एका वर्षात होते निवड.

भारतीय डाक विभागाकडून दीनदयाल स्पर्श योजनेच्या माध्यमातून दरवर्षी भारतातील एकूण 920 विद्यार्थ्यांची या स्कॉलरशिप योजनेसाठी एका वर्षासाठी निवड करण्यात येते.प्रत्येक पोस्टल सर्कल मधून मिळून इयत्ता 6 वी ते 9 वी पर्यंतच्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप यातून देण्यात येते.याची रक्कम दर तीन महिन्यात संबंधित बँक खात्यात जमा करण्यात येते. दरमहा 500 असे मिळून एका वर्षासाठी एकूण 6 हजार रुपये पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येते.

विशेष म्हणजे या योजनेत यापूर्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीही याच योजनेत अर्ज करता येते. म्हणजे विद्यार्थी या योजनेचा आपल्या शैक्षणिक खर्च बाबी पूर्ण करण्यासाठी निरंतर लाभ घेऊ शकणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेमध्ये फिलोटली क्लब Filoteli Club नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे स्वतःचे फिलोटली डिपॉझिट खाते या योजनेत विचारात घेण्यात येते.

यासाठी विद्यार्थ्यांना डाक कार्यालयामध्ये आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा प्रमाणपत्र, कुटुंबाचा राशन कार्ड (याच्यात विद्यार्थ्याचे नाव नमूद असणे गरजेचे आहे),विद्यार्थ्यांचा आधार कार्ड अर्ज जोडावी लागते.यासाठी इच्छुक विद्यार्थी या वेब्साईट अर्ज करू शकतात.

Dindayal Sparsh Yojna : https://www.indiapost.gov.in

60% किंवा त्यापेक्षा अधिक अंक मिळविणारे विद्यार्थी योजनेसाठी पात्र.

विशेष म्हणजे फिलोटली डिपॉझिट खात्यामध्ये विद्यार्थ्याच्या सदस्यात्वाचा तपशील राहणे आवश्यक आहे. या योजनेत भाग घेताना विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज पोस्ट कार्यालयाच्या वरिष्ठ अधीक्षकांकडे जमा करावा लागेल.अर्जासोबत विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेला प्रोजेक्ट द्यावा लागणार आहे.

या स्कॉलरशिप योजनेसाठी विद्यार्थ्यांचे किमान 60% किंवा त्यापेक्षा अधिक अंक मिळवून परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या एसटी आणि एसटी श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी किमान 55 टक्के अंक घेऊन परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य राहणार आहे.

या योजनेशी संबंधित काही खास गोष्टी.

  • या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज नोंदणीकृत, स्पीड पोस्ट किंवा वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक किंवा संबंधित पोस्टल विभागाच्या पोस्ट ऑफिस अधीक्षकांच्या कार्यालयात वितरित करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड एका वर्षासाठी केली जाते.
  • एकदा निवडल्यानंतर, विद्यार्थ्याने इतर अटी पूर्ण केल्यास, तो पुन्हा अर्ज करू शकतो.
  • शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह पोस्ट ऑफिस किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत संयुक्त खाते उघडावे लागेल.
  • या योजनेंतर्गत प्रत्येक शाळेला एक फिलाटेली मेंटॉर दिला जातो.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

4 × 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.