Digital Business : डिजिटल बिजनेस मध्ये ‘भारत’आता या देशांचा बनला बिग बॉस”?
भारत आता डिजिटल निर्यात व्यवसायात अग्रणी देशात सामील !
आधुनिक युग हा डिजिटल संचार माध्यमांचा युग आहे आणि जगात पाचवी अशी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतर भारताने डिजिटल व्यवसायात गगनभरारी घेतली आहे. भारत देशाने डिजिटल निर्यात व्यवसाय क्षेत्रात चीन आणि जपानला सह अनेक देशांना ही मागे टाकले आहे.मजबूत अर्थव्यवस्था बनलेला भारत हा डिजिटल निर्यात (Digital Exports Business)क्षेत्रात आता चीन आणि जपानचाही बॉस बनला असून या Digital Export व्यवसायात जगात त्यांच्या समोर आहे.
कोणत्या क्रमांकावर आहे भारत?.
आज स्मार्टफोन कम्प्युटर लॅपटॉप इंटरनेट वाय फाय, ब्रॉडबैंड, फिल्म प्रोडक्शन मीडिया सह आधुनिक संचार युगात डिजिटल संसाधन आणि उपकरणांची जगातील प्रत्येक देशात खूप डिमांड आहे. कोणत्याही देशासाठी डिजिटल उपकरणांचे उत्पादन आणि व्यवसाय हा महत्त्वाचा आर्थिक कणा बनलेला आहे. मागील काही अवधीत भारताने डिजिटल निर्यात व्यवसायात आधी आपल्या समोर असलेल्या आर्थिक महाशक्ती चीन आणि तांत्रिक क्षेत्रात प्रगत असलेल्या जपान आणि जर्मनीला सुद्धा मागे सोडले आहे.आता डिजिटल निर्यातीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि आयर्लंडच्या डिजिटल निर्यात व्यवसायात भारताच्या थोडे पुढे आहे.
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची रिपोर्ट.
जगात प्रत्येक वस्तूंच्या वैश्विक व्यापार, आयात निर्यात आणि यामध्ये देशांची आर्थिक व्यवसायिक चढ-उतार यावर जागतिक व्यापार संघटना (World Tred Organisation) ची रिपोर्ट महत्त्वाची असते. डिजिटल निर्यात क्षेत्रात भारतासंदर्भात जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार,2023 मध्ये भारताने 257 अब्ज डॉलरची डिजिटल निर्यात केली आहे.यात 2022 पर्यंत 17% वाढ नोंदविण्यात आली आहे.ही व्यवसायिक वाढ चीन आणि जर्मनीच्या 4% वाढीपेक्षा खूप जास्त आहे.
4 वर्षात भारताची डिजिटल निर्यात झाली दुप्पट.
मागील चार वर्षात भारताने डिजिटल निर्यात व्यवसाय {India Digital ServiceExport} दुप्पट केले आहे.यात जागतिक सेवा व्यापारात.भारताचा वाटा या काळात एकूण 20 टक्क्यांवर पोहोचला आहे.भारताकडून डिजिटल प्रणालीने सेवा (DSS)वितरित करतांना व्यावसायिक सेवा संगणक नेटवर्कद्वारे प्रदान केल्या जात असतात.2023 मध्ये भारताची जगभरातील डिजीटल निर्यात 4.251 अब्ज डॉलर्सची होती. तर यामध्ये अमेरिका हा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.त्याने मागील वर्षी 649 अब्ज डॉलरच्या डिजीटल वितरण सेवांची निर्यात केली.त्यापाठोपाठ यू.के.(United Kingdom) ची डिजिटल वितरण सेवा सेवा निर्यात $438 अब्ज होती. तर लहान असतानाही तांत्रिकरित्या प्रगत देश आयर्लंडने $328 अब्ज किमतीच्या डिजिटली वितरित सेवा निर्यात केल्या आहेत. तर या यादीमध्ये जर्मनी 248 अब्ज डॉलरचे व्यवसाय करून पाचव्या आणि चीन 207 अब्ज डॉलर निर्यात व्यवसाय मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
डिजिटल सेवा वितरण निर्यात व्यवसायात अग्रणी देश आणि कामगिरी.
1.यूएस.(US) $649 अब्ज डॉलर डिजिटल निर्यात
2.ब्रिटन: $438 अब्ज
3.आयर्लंड: $328 अब्ज
4.भारत: $257 अब्ज
5.जर्मनी $248 अब्ज डॉलर
6.चीन: $207 बिलियनसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे.
टॉप 20 मध्ये हे देश.
डिजिटल सेवा वितरण निर्यात व्यवसायात अग्रणी देश आणि कामगिरीची जागतिक व्यापार संघटनेने घेतानाच या निर्यात व्यवसाय आणि सेवा इतरांक्षेत्रात शिखरावर असलेल्या देशांची निर्यात सेवा आणि व्यवहारी व्यवसायाची टक्केवारीनुसार विभागणी केली आहे. यानुसार या क्षेत्रात टॉप ट्वेंटी मध्ये अमेरिका, युके, आयर्लंड, भारत, चीन,जर्मनी जपान यांच्यासह खालील क्रमांकावर नेदरलँड्स, सिंगापूर, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जपान, स्वित्झर्लंड, बेल्जियम, कॅनडा, स्वीडन, स्पेन, इस्रायल, दक्षिण कोरिया, इटली आणि UAE हे देखील डिजिटल पद्धतीने वितरित सेवा निर्यातीच्या बाबतीत शीर्ष 20 देशांमध्ये सामील आहेत.
यात नेदरलँड्सने गेल्या वर्षी 2023,मध्ये $194 अब्ज किमतीच्या डिजिटल सेवा निर्यात केल्या, तर सिंगापूरने $182 अब्ज किमतीच्या डिजिटल सेवांची निर्यात केली आहे.यासोबतच फ्रान्सने 170 अब्ज डॉलर, लक्झमबर्ग 122 अब्ज डॉलर, जपान 116 अब्ज डॉलर आणि स्वित्झर्लंडने 111 अब्ज डॉलरची डिजिटल वितरण सेवा निर्यात केली आहे.