Digital Arrest : काय आहे “डिजिटल अटक”? कधी पोलीस,सीबीआय,ईडी करते का “Digital Arrest” ?
अलिकडे देशभरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये खूप वाढ होत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी डिजिटल साधने,संचार साधने वापरताना सावधगिरी आणि जागरूक राहणे गरजेचे झाले आहे.कारण आता सायबर पोलीस आणि सायबर क्राईमच्या नावावर डिजिटल अटके(Digital Arrest)सारखी प्रकरणे होत आहे.पण सावध राहून यापासून आपण या धोक्याच्या कारवाई पासून स्वतःला वाचवू शकतो.
विशेष म्हणजे कारण डिजिटल युगात सायबर क्राईम (Cyber Crime) हाताळणारी यंत्रणा,आणि कोणत्याही राज्यातील पोलीस किंवा तपास एजन्सी फोनवर डिजिटल पद्धतीने कोणालाही अटक कधीच करीत नाही.अश्या सरकारी यंत्रणांच्या अधिकारांच्या नावाने दुसरीकडे सायबर ठग स्वतः ला पोलिस आणि इतर एजन्सीचे अधिकारी दर्शवून सायबर क्राईम घडवून आणतात.ते आपल्या online trap मध्ये लोकांना अडकवून आणि घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळतात.त्यामुळे आपण जानून घेवू या नेमक काय प्रकार असते डिजिटल अरेस्ट……
सायबर दरोडेखोरांकडे अनेक नवीन मार्ग.
सायबर क्राईम आणि ठगांकडून होणाऱ्या डिजिटल अरेस्ट सारख्या फसव्या प्रकरणातून नागरिक वाचावे यासाठी
पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम्स… या सर्व सरकारी एजन्सी जनजागृती करतात. मात्र सायबर दरोडेखोरांकडे अनेक नवनवीन उपायाने मार्ग असल्याने दररोज देशात हजारो लोक सायबर क्राईम आणि डिजिटल अरेस्ट सारख्या फसव्या मामल्याचे शिकार होतात.असे ठगबाज कोणालाही फोन करून तुमच्याकडून सायबर क्राईम घडल्याची माहिती देत घाबरवून देतात.आणि स्वतःला सायबर क्राईम एजन्सी,पोलीस अधिकारी कर्मचारी सांगून सायबर क्राईम मुळे होणारी डिजिटल अटक होण्याची भीती दाखवून ती टाळण्यासाठी ऑनलाईन आर्थिक लूट करतात.
सावध आणि जागरूक असाल तरच सुरक्षित राहाल.
सायबर गुन्हेगार इतर पद्धतीही अवलंबतात. आजकाल शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत.त्यामुळे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (ICERT)ने सायबर फ्रॉडच्या अलीकडील चलनात असलेल्या कार्यप्रणाली बद्दल माहितीही सार्वजनिक केली आहे. यात आता डिजिटल अटक हा फसवणुकीचा नवा प्रकार समोर आल्याने सायबर क्राईम मध्ये हा भाग मोडतो,त्यामुळे यासंबंधात नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे,जेणेकरून सावध आणि जागरूक नागरिक यापासून सुरक्षित राहणार.
डिजिटल अटक म्हणजे काय?.
सायबर ठकांकडून ही नवी पद्धती अमलात आल्यानंतर आता सर्वांना डिजिटल अटक म्हणजे नेमके काय हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.यात सायबर गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय दरोडेखोर हे पोलिस, कस्टम, ईडी, सीबीआय, आरबीआय, ट्राय किंवा कस्टम अधिकाऱ्यांची नावे घेवून ट्रॅप.कुणालाही कॉल करून असे लोक मनी लाँड्रिंग किंवा ड्रग्जच्या खेप यांसारख्या आरोपांमध्ये तुम्ही सामील असल्याचा दावा करून जाल टाकतात. लोकांना कॉल करून ते समोरच्या व्यक्तीला तुम्ही आता सायबर कायद्यानुसार डिजिटल अटकेत असल्याची माहिती देवून त्यांना फसवून नंतर बार्गेनिंग करून त्यांनी दिलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करवून घेतात.
सायबर दरोडेखोर आपला ट्रॅप असे टाकुन अडकवतात?.
माहितीनुसार अनेक वेळा, दरोडेखोरांनी थेट फोन कॉलवर किंवा इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) कॉलद्वारे डिजिटल अटकेची भीती दाखविली.यात कोणत्याही बँक किंवा मोबाइल कंपनीच्या कस्टमर केअरशी बोलण्यासाठी कॉल करताना ते कॉल नंबर IVR ने घेतले जातात.मग हे सायबर गुन्हेगार हे नंबर घेवून लोकांना भीती दाखवून अडकवतात.यानंतर ते संबंधितांना व्हिडिओ कॉल करतात,यात हे गुन्हेगार असतानाही ते एखाद्या सरकारी विभागाप्रमाणे सेटवर बसलेला पोलिस किंवा कस्टम अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसतो.तेव्हा त्यांचा पीडित व्यक्ती देण्यात येत असलेल्या धमक्यां आणि भीतीने स्वतःला असहाय्य मानतो,यानंतर यातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारतो तेव्हा ते फेक ऑफिसर पीडित कडे लाच मागतात.पीडित स्वत:ला डिजीटल अरेस्ट समजून किंवा कायद्यात अडकलेला समजून, तो पीडित व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार सर्वकाही त्यांना देण्यास तयार होते. अशा प्रकारे, फसवणूकीचा हा प्रकार पूर्ण होईपर्यंत सायबर गुन्हेगार अधिकारी बनुन पीडित व्यक्तीला आपल्या व्हिडिओ कालिंग ने कॅमेरासमोर एका प्रकारे ऑनलाईन जकडून ठेवतात,अश्या प्रकारे फसवणूक करणाऱ्या पद्धतीलाच डिजिटल अटक (Digital Arrest)हा शब्द वापरला जातो.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखालीही फसवणूक.
सध्या सायबर गुन्हेगार हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत. कॉल करून मोफत शेअर ट्रेडिंग शिकविने.शेअर ट्रेडिंग शिकण्यासाठी ऑनलाइन वर्ग चालवून विश्वास जिंकतात. यानंतर ते गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याच्या आमिष दाखवून ट्रॅप मध्ये अडकलेल्यांकडून आर्थिक फसवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून घेतात.याव्यतिरिक्त फिशिंग घोटाळा करण्यासाठी नामांकित कंपन्यांच्या नावाने मेल करून सायबर चोर नामांकित कंपन्या आणि सरकारी विभागांची नावे आणि लोगो वापरतात.मेसेज किंवा व्हॉट्सॲप पाठवून KYC करण्यास सांगुण अन्यथा खाते बंद केले जाण्याची माहिती देतात.यासाठी असे लोक APK (एखादे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक) फॉरमॅटमध्ये असलेली लिंक देतात. यावर क्लिक करताच, मोबाइल फोन हॅक होतो आणि मग ते तुमच्या फोनवरून ओटीपी घेतात आणि तुमचे खाते रिकामे करतात.
डिजिटल अरेस्ट सह फसवणुकीचे हे अनेक प्रकार.
नोकरी घोटाळा
चुकून पैसे पाठवल्याचा घोटाळा
भावनिक फसवणूक
गुंतवणुकीसाठी प्रेरित करून आर्थिक फसवणूक
असे अनेक ऑनलाईन कालींग प्रकारातून सध्या डिजिटल प्रणालीने ठगबाजी सुरू असल्याने सर्वांनी सावध राहून आर्थिक फसवणूक टाळणे गरजेचे झाले आहे.
असे होतात फसवणुकीचे प्रकरण.
सायबर दरोडेखोर खोट्या नोकऱ्या भरतीसाठी मेसेज आणि लिंक पाठवतात. लोक लिंकवर क्लिक करतात आणि अर्ज करतात. यानंतर हे दरोडेखोर फी किंवा जॉईनिंग किटच्या नावाखाली पैसे उकळतात.
चुकून तुमच्याकडे पैसे ट्रान्सफर झाले, असे सांगू सायबर दरोडेखोर पैसे परत करण्याचा आग्रह धरतात. पीडितेने पैसे परत करताच, त्यांनी त्याचा फोन हॅक करून व्यवहार अयशस्वी झाल्याचा संदेश पाठवला. या क्रमाने ते खात्यातून पुन्हा पुन्हा पैसे ट्रान्सफर करतात.
सायबर चोर मॅट्रिमोनिअल साइट्स, डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करतात. मग हळूहळू नात्यात गंभीर होण्याबद्दल बोला. भावनिक नातेसंबंध बांधल्यानंतर आणीबाणी असल्याचे सांगून लोकांचा बळी घेतला जातो किंवा भेटवस्तू प्रथेत अडकल्याच्या बहाण्याने परदेशातून भेटवस्तू पाठवल्या जातात.
अशी बाळगा सावधानी आणि रहा जागरूक.
एखाद्या कॉलिंग द्वारे कुणी डिजिटल अरेस्ट बाबत,अटक किंवा कोणत्याही कारवाईबद्दल सांगितले आणि बोलले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा.
आपल्या नावावर परदेशातून पार्सल आल्याचा कॉल किंवा मेसेज आला तर सावध रहा. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन याची माहिती तात्काळ घ्या.
कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आधी योजनेची सत्यता तपासा.अधिकृत सेबी (SEBI) कडून नोंदणीकृत कंपन्यांवर विश्वास ठेवा.
तुमच्याकडे कोणतेही बिल भरण्याचा दावा असल्यास, संबंधित कंपनीशी थेट संपर्क साधा. कॉलवर दिलेल्या कोणत्याही बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे कटाक्षाने टाळा.
कोणी नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती आर्थिक मदत मागत असतील तर प्रथम कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्याची सत्यता तपासून घ्या.
ऑनलाइन कामे करून पैसे कमावण्याचे आश्वासन देणारे संदेश आणि अश्या फेक नेटवर्क पासून सावध रहा.
फी जमा केल्यानंतरच खाजगी,शासकीय नोकरीची कोणतीही ऑफर आली तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा.
अधिकृत सरकारी पोर्टल आणि नोंदणीकृत कंपन्यांद्वारेच नोकरीसाठी अर्ज करा.
आधार क्रमांक, बँक तपशील किंवा पासवर्ड यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर कधीच शेअर करू नका.