धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी.ईसापुर(धरण)*
पुसद :- येथील विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे ४ थे न्यायालय श्रीमती एस एस जाधव मॅडम यांनी आज दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस चेकची दुप्पट रक्कम दंड व ३ महिन्याच्या सध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की आरोपी सौ. कमल दत्तराव पतंगे हिन फिर्यादी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था पुसद या पत संस्थेकडून रक्कम रू. ५०,०००/- पन्नास हजार रुपयाचे कर्ज घेतले होते.
सदर कर्जाची आरोपीने नियमित परतफेड न केल्याने आरोपीवर पतसंस्थेचे थकीत कर्ज बाकी होते. त्या थकीत कर्जाच्या रक्कमेच्या परत फेडिकरिता आरोपीने धनादेश दिला होता. सदर धनादेश अनादरित झाल्याने पतसंस्थेने पुसद येथील न्यायालयात आरोपी विरूद्ध धनादेश अनादर प्रकरण दाखल केले व विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी ही दोषी आढळल्याने आरोपी सौ.
कमल दत्तराव पतंगे हिला चेकची दुप्पट रक्कम दंड व तीन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी पत पतसंस्थेकडून ॲड. ए. ए.खान, ॲड. अनिल ठाकूर, ॲड. अर्जुन ठाकूर व ॲड. रवि वाघमारे यांनी कामकाज पाहिले.