Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस राजकारणातून out होणार का?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस राजकारणातून out होणार का?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस राजकारणातून out होणार का?

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नितीन गडकरी विनोद तावडेना महाराष्ट्रात सक्रिय करण्यासाठी लॉबिंग

भारतीय जनता पार्टीची अनुशासित राजकीय पक्ष म्हणून ओळख आहे. पण या पक्षात आपल्याच नेत्याना महाराष्ट्रातील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी षडयंत्र आखले जात आहे,यासाठी कुटील राजकारण सुरू आहे.हे शिवसेना युबीटी नेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे.भाजपमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवून त्यांच्या जागी महाराष्ट्राच्या राजकारणात दिग्गज नेते विनोद तावडे यांना सेट करण्याचा प्रयत्न होत आहे असा घनाघाती खुलासा सुषमा अंधारे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सोमवारी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना याबाबत महत्वाचे विधान केले.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे.

महाराष्ट्रात भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मात्र त्यांना प्रत्येक आणि पक्ष संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी भाजप हाय कमांड वेट अँड वॉच वर ठेवत आहे.भाजप नेत्यांचा हा फडणवीस यांना राजकारणातून संपविण्याचा घात आहे. यासाठी भाजप मधील एक लॉबी खूप सक्रिय आहे,असा दावा शिवसेना युबीटी उपनेत्यांनी केला आहे.या बाबत संदर्भ देताना लातूर येथे अंधारे म्हणाल्या की, भाजपच्या राजकारणात नवीन असलेल्या नवनीत राणासारख्या माजी खासदारांना दिल्ली येथे वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी अगदी लवकर वेळ मिळते मात्र अनेक प्रसंग असे आहेत, ज्यात देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांना दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते वेटिंगवर ठेवले जात आहे. महाराष्ट्रात भाजपचे नवीन नेतृत्व म्हणून भाजप वरिष्ठ नेते नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचे नाव राज्यातील राजकारणात भाजपकडून समोर आणल्या जात आहेत. दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करण्यासाठी लॉबिंग करणारी मंडळी सक्रिय आहे,असे विधानही अंधारे यांनी केली.

स्वतःवाढवलेल्या भस्मासुराचा हात डोक्यावर पडणार.

राज्यातील राजकारणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना कुटील राजकारण करण्यात किंबहुना राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या राजकारणाबाबत चर्चा होत असते. याबाबत सुषमा अंधारे यांनी आपल्या परीने फडणवीस यांच्या राजकारणाची परिभाषा देताना म्हटले की राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी कुटील राजकारणाचा जो भस्मासुर वाढविला आहे तोच भस्मासुर आता फडणवीस यांच्या डोक्यावर हात ठेवेल की काय अशी परिस्थिती आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसविण्यासाठी फडणवीस यांनी अथक परिश्रम घेतली पण आता तेच शिंदे राजकारणातून फडणवीस यांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असा आरोप सुद्धा शिवसेना उपनेते अंधारे यांनी लावला आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आम्ही जे विचारले तेच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा सरकारला विचारले आहे.

यावेळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बोलताना सुषमा अंधारे म्हणाले की नुकतेच या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर करण्यात आला.त्याच्या मृत्यूवर आम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते त्याच मुद्द्यांवर आधारित प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारले आहे. अक्षय शिंदे आरोपी होता, तो कोणताही साधू संत नव्हता हे आम्हालाही माहिती आहे, असे गंभीर कृत्य केल्याने तो मरायलाच हवे अशी आमचीही भावना होती,पण त्याला अशा पद्धतीने एन्काऊंटर मध्ये मारल्याने बदलापूर घटनेतील अनेक सत्य बाहेर येऊ शकले नाही.बदलापूर अत्याचार प्रकरणात केतन तिरोडकर यांच्या याचिकेवर त्यांनी लक्ष वेधून म्हटले की तिरोडकर यांची या संबंधातील याचीका महत्त्वाची आहे.त्यात स्पष्टपणे असे म्हटले आहे की बदलापूर येथील ज्या शाळेमध्ये ही गंभीर घटना घडली त्या शाळेत चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि मानवी तस्करी होत होती,हा खुलासा याचिकेतून होताच या बाबींशी निगडित आपटे नामक व्यक्ती अद्यापही आहे. त्याला आणि स्कूल मॅनेजमेंटला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला असा आरोप अंधारे यांनी लावला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 6 =