यवतमाळ शहराच्या कायम स्वरुपी पट्टे व घरकुल संदर्भात उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा जिल्हाधिकारी यांना फोन व विशेष पत्र.

यवतमाळ शहराच्या कायम स्वरुपी पट्टे व घरकुल संदर्भात उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा जिल्हाधिकारी यांना फोन व विशेष पत्र.

मो.तारिक लोखंडवाला व करिम खान यांच्या निवेदनाची घेतली दखल.

यवतमाळ शहरातील रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मो. तारिक लोखंडवाला व करिम खान यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना निवेदन दिले.

निवेदनात यवतमाळ शहरातील नेताजी नगर, अंबा नगर, तलाव फैल १ व २, तारपूरा, सेवा नगर, कुंभारपुरा , इंदिरा नगर, पाटीपुरा, डोरलीपुरा, अशोक नगर, प्रकाश नगर, पिंपळगाव झोपडपट्टी या बारा परिसरातील कायम स्वरुपी पट्टे व घरकुल योजना अनेक वर्षा पासून प्रलंबित असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात आणून दिले.

असता यवतमाळ जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून संभाषण साधत तात्काळ कायम स्वरुपी पट्टे व घरकुल मंजूर करणे बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना आदेशित केले. सततच्या पाठपुराव्याची दाखल घेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी संबधित सर्व विभागांची बैठक आयोजित केली.

बैठकीत सतत पाठपुरावा करणारे राष्ट्रवादीचे नेते तारिक लोखंडवाला, करिम खान, ॲड. प्रशांत किर्दक, नेताजी नगर चे सामाजिक कार्यकर्ते हेमंत कांबळे, तलाव फैल चे अजय खंतडे, पाटीपुरा चे नितीन धुळे, शुभम वानखडे, शेख साबीर, यांना निमंत्रित करत एक प्रकारचे विकासाला अग्रगण्य असल्याचे सिद्ध केले. या बैठकीत निश्चितच सगळ्या समस्या निकाली काढण्यासाठी आश्वस्त केले..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + fifteen =