Dengue  Yavatmal: आता डेंगूचा खतरा,सावध रहा !

Dengue Yavatmal: आता डेंगूचा खतरा,सावध रहा !

Dengue Yavatmal: पावसाळ्याच्या दिवसात इतर डासांसह डेंगूच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते.त्यामुळे या डासांच्या प्रतिबंध करणे आवश्यक आहे.  अन्यथा  डेंग्यूशी  सामना करावा लागू शकतो. सध्या पावसाळ्याच्या दिवस आहेत. वातावरण मोठा बदल झाला आहे. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत आहे. संक्रमित डासांपासून या आजाराची उत्पत्ती होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तुम्ही घ्या तुमच्या घराची काळजी.डासांच्या उत्पत्तीची शेकडो ठिकाणे.

मागील भागातील पाणी कुलर तसेच कुंड्या गच्चीवर असणाऱ्या वस्तूंमध्ये पाणी साचू न देणे या सह इतर काळजी नागरिकांनी घ्यावी.रोप,कुंडल्यांमध्ये पाणी, विना वापर वस्तूंमध्ये पाण्यापासून किंवा नालेसफाई न झाल्यामुळे डेंग्यू आजाराच्या डासांची निर्मिती होते. हा डास चावल्यास डेंगू आजाराची लागण होते. आजार  थांबविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.पावसाळ्यात ठीक ठिकाणी पाणी साचून डेंगू सदृश्य आजाराची लागण होणाऱ्या डासांची निर्मिती होऊ शकते.त्यामुळे नागरिकांनीही एक दिवस कोरडा पाण्याची गरज आहे.

शहरात विविध प्रकारच्या डासांची  उत्पत्ती होणारी शेकडे ठिकाणे आहेत.सांडपाण्याच्या नाल्या,नाले, मुतारी बाजारपेठ मोकळ्या मैदानात साचलेले पाणी अशा अनेक ठिकाणांच्या त्यात समावेश आहे.

डासांना आवरा नाही तर डेंगूंशी सामना,वातावरण बदलाच्या फटका: डासांची उत्पत्ती वाढली नागरिकांनी काळजी घ्यावी.

जिल्ह्यात तूर्तास डेंगूचे रुग्ण नाही.

येथील जिल्हा रुग्णालयात सध्या एकाही डेंगूच्या रुग्णाची नोंद नाही. गेल्या अनेक महिन्यापासून डेंगूचे रुग्ण आढळले नसल्याचे सांगण्यात आले.

घरघर जाऊन केली तपासणी.

तीन वर्षांपूर्वी शहरातील पाच ते सहा भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्या भागासह इतर ठिकाणीसुद्धा  उपजिल्हा रुग्णालयाकडून  नियमितपणे तपासणी सुरू आहे. त्यामुळे शहरात तूर्तास एकही डेंगू रुग्ण आढळला नाही.

पालिकेची मोहीम.

नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात साफसफाई व फवारणी करण्यात आली.डेंग्यूचे रुग्ण आढळलेला भागात विशेष मोहीम राबविण्यात येते.पावसाळ्यात साचलेल्या पाण्यावर फवारणी केली जाते. नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 20 =