Delhi School Bomb Threat : 30 हजार डॉलर द्या नाही तर….. कुणी दिली दिल्लीत 40 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी ?
दिल्ली मध्ये शाळांना बॉम्बने उडविण्याचा धमक्या देण्यात आल्या आहेत.दिल्लीमधील 40 शाळांना ई-मेल पाठवून बॉम्बने उडवून देण्याचा धमक्या मिळाल्या आहेत.विशेष म्हणजे यापूर्वीही दिल्लीतील या शाळांना अश्याच प्रकारे धमक्या देण्यात आल्या होत्या. आता e-mail पाठवून 30 हजार डॉलर देण्याची मागणी करून दिल्लीतील प्रसिद्ध डीपीएस आरके पुरम तसेच पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूलल सह तब्बल 40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.या शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळताच सरकारच्या सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणा अलर्ट मोड वर आल्या असून दुसरीकडे या धमक्यानंतर सोमवारी शाळा व्यवस्थापनाकडून शाळा बंद ठेवून तेथील मुलांना घरी पाठविण्यात आले.
8 डिसेंबर रोजी रात्री 11.38 वाजता मिळाले ई-मेल
दिल्लीतील चाळीसहून अधिक शाळांना बॉम्बने उडविण्याची ई मेल्स द्वारे देण्यात आली असून,रविवारी 8 डिसेंबर रोजी रात्री 11.38 वांजताच्या च्या सुमारास हा मेल आला. हा मेल पाठवणाऱ्याने तीस हजार डॉलर्सची मागणी केली आहे.यात दिल्लीत प्रसिद्ध डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूललाही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. या मेलसंबंधात माहिती पोलीस,तपास यंत्रणांना देण्यात आली असून शाळांमध्ये तात्काळ अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलेत.या संपूर्ण प्रकरणाची तपास सुरू करण्यात आला आहे.
मेल पाठवनाऱ्याने मागितले तीस हजार डॉलर्स.
दिल्लीमधील शाळेला ई मेल पाठवून शाळेच्या आवारात बॉम्ब पेरण्यात आल्याची माहिती मेलमध्ये देण्यात आली.हे बॉम्ब फुटले तर मोठे नुकसान होईल असे धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीने यात सांगून बॉम्ब न फोडण्यासाठी 30 हजार डॉलर्स मागितले आहेत.दरम्यान दिल्ली पोलिस आणि सरकारी तपास यंत्रणा या ई मेलचा आयपी ॲड्रेस आणि याला पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास करत आहे
यापूर्वीही देण्यात आल्या शाळांना अश्याच धमक्या.
विशेष म्हणजे यापूर्वी 20 नोव्हेंबरलाही दिल्लीतील रोहिणी भागात असलेल्या व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. तर तामिळनाडूतील एका CRPF शाळेला 21 ऑक्टोबर रोजी बॉम्बची धमकीही मिळाली होती.
20 ऑक्टोबरला दिल्लीत रोहिणी भागात CRPF शाळेच्या भिंतीत झाला होता स्फोट.
20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रोहिणी भागात असलेल्या CRPF शाळेच्या भिंतीत स्फोट झाला होता. यामुळे शाळेच्या आजूबाजूच्या काही दुकाने आणि वाहनांना नुकसान पोहोचले होते.तेव्हा खलिस्तान समर्थक टेलिग्राम या गटाने या शाळा परिसरात झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू करून या टेलिग्राम गटाची माहिती संकलित केली होती,याचा तपास अजूनही सुरू आहे.विशेष म्हणजे अलीकडे अनेक शाळा, विमान कंपन्या, हॉटेल्स आणि स्थानकांनाही बॉम्बने उडविण्याचा धमक्या मिळाल्या,मात्र तपासाअखेर या घटना खोट्या असल्याचे सिद्ध झाले आहे.
खोट्या धमक्यांचे प्रमाण 2024 मध्ये वाढले.
मेलद्वारे पाठविण्यात येत असलेल्या अश्या धमक्या संदर्भात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मागील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन केले होते.यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी माहिती देताना सांगितले होते की, एअरलाइन्सना मिळणाऱ्या खोट्या धमक्यांचे प्रमाण 2023 मधील 122 वरून 2024 मध्ये 994 पर्यंत वाढले आहे, फेक धमक्यांची ही वाढ एका वर्षात 714.7 टक्के आहे. जूनमध्ये देशातील विविध एअरलाइन्सला 666 बॉम्बच्या धमकीचे कॉल आले. याच जूनमध्ये अशा 122 धमक्या मिळाल्या आहेत. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 15 धमकीचे कॉल रेकॉर्डही करण्यात आले होते.या संपूर्ण प्रकरणाची तपास करण्यात येत असल्याचेही मोहोळ म्हणाले होते.