दारव्हा येथे पहिल्या डिजिटल शाळेचे लोकार्पण.

दारव्हा येथे पहिल्या डिजिटल शाळेचे लोकार्पण.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

शाळेतील फळाही झाला डिजिटल : चार वर्गखोल्यांत बसविले प्रत्येकी २० संगणक.

दारव्हा : दारव्हा येथे जिल्ह्यातली पहिली डिजिटल सरकारी शाळा सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून, १५० हून अधिक विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेतील प्रत्येक वर्गखोल्यात २० संगणक बसविण्यात आले आहेत. त्यावर एकाचवेळेला चार विद्यार्थी लिहू शकतात. तसेच प्रत्येक वर्गखोलीत डिजिटल फळा बसविण्यात आला असून, या सर्वांना इंटरनेटची जोडणी देण्यात आली आहे.

याशिवाय शाळा इमारतीच्या भिंती नव्या त-हेने निर्मित केलेल्या आहेत. या सर्व सोयीसुविधांसाठी दारव्हा नगरपरिषदेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेतून निधी देण्यात आला आहे. लोकार्पण कार्यक्रमाला मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, मनोज सिंगी, राजू दुधे, दामोदर लढा, आरिफ काझी, विकास जाधव यांच्यासह मुख्याध्यापक, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच टॅब देण्याची भूमिका असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नगरपरिषदेच्या इतर शाळाही डीजिटल करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + four =