मतिमंद युवकावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमास पोलीसांनी ठोकल्या बेडया.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा : तालुक्यातील हातोला गावातील एका मतिमंद २१ वर्षीय युवकावर गावातीलच शेजारी राहणा- या बसता श्रीराम वजारी वय ५९ वर्षे या नराधमाने अनैसर्गिक शारिरिक अत्याचार केल्याची घटना काल रोजी घडली असून दारवा पोलीसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. काल या युवकाचे आईवडील शेतात कामाला गेल्याने हा पिडित युवक घरी एकटाच होता ही संधी साधुन या आरोपीने त्याच्या घरात शिरून या युवकावर अनैसर्गिक संभोग केला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यावेळी हा युवक ओरडल्याने शेजारी राहणारी पिडिताची काकू धावुन आली असता तिला हा प्रकार दिसल्याने तिला धक्काच बसला पिडित युवकाचे आरोपोंने कपडे काढून त्यास नग्न केले होते. त्याच्या काकूने याबाबत तात्काळ पिडिताच्या आईवडिलाना कळवताच त्यानी दारव्हा पोलीस स्टेशन ला धाव घेवुन सर्व हकिकत पोलीसांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखुन ठाणेदार पोलीस निरिक्षक विलास कुलकर्णी यांनी सहका-यांसह हातोला गाठुन आरोपीस ताब्यात घेतले.

पिडीत युवकाच्या काकूच्या फिर्यादीवरून दारव्हा पोलीसांनी आरोपी वसंता श्रीराम वजारी बय ५९ वर्षे ग. हातोला ता. दारव्हा याचेविरूध्द अप क.११/२४ भा.दं. वि. ३७७,४५२ सह अपगत्त्व अधिनियम २०१६ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस राबीच अटक केली आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड सर, अप्पर पोलीस अधिक्षक मा पियुष जगताप सर, सहा पोलीस अधिक्षक दारव्हा चिलुमुला रजनिकांत सर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास कुलकर्णी, किरण राठोड सुरेश राठोड मिथुन राठाडे, यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि धनंजय रत्नपारखी, पोकों अमोल सोनोने हे करीत आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × one =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.