सायखेड येथे शनिवारपासून श्री गुणवंत बाबा प्रकटदिन व यात्रा सोहळा.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
दारव्हा- विश्वप्रभू गुणवंतबाबा दरबार (कुटी) सायखेड ता. दारव्हा जि. यावतामाळ यांच्या वतीने श्री. गुणवंत बाबा प्रकटदिन आणि यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार (दि.५) ते शनिवार (दि. १२) जानेवारी दरम्यान विश्वप्रभू गुणवंतबाबा दरबार (कुटी) सायखेड येथे संपन्न होणार आहे. या निमित्त शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा, महादेवाच्या गाण्याची भजन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,भारुड,कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार (दि.१२) जानेवारी सकाळी १० ते १२ या वेळेत भव्य पालखी काढण्यात येणार आहे. यावेळी गुणवंत बाबांचे अनुयायी छिंदवाड येथील वसंत महाराज उपस्थित राहणार आहेत. सायखेड दत्तवाडी येथील बँड पथक हे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
ह.भ.प.सुखदेव महाराज चव्हाण यांच्या सुमधुर वाणीमधून शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला प्रारंभ होईल. शनिवारी (दि. ०६) या सोहळ्याचा समारोप सायखेडा येथील हभप अनंता महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्या नंतर लगेचंच महाप्रसादाला सुरुवात होईल.