शौचालय योजना राबवूनही काही ग्रामस्थांच्या हातून टमरेल सुटेना.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
दारव्हा: तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी सौचालययाचे लाभ देऊनही हातातील टमरेल सुटता सुटत नाही. यामुळे हगणदारी मुक्त गाव पुरस्कार प्राप्त असताना सूद्धा काही ग्रामस्थांच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आरोग्याला घातक रोग राई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करीता तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने प्रभावी धोरण आखणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांना शासनाच्या वतीने ज्या नागरिकांच्या कुटुंबात सौचालय व्यवस्था नसेल अशा कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने सौचालय बांधकाम साठी आर्थिक लाभ देऊन हगणदारी मुक्त करण्याचा निर्णय शासनाचा आहे. तसेच तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर व्हावे या करीता शासनाच्या विविध योजना राबवून जनजागृती करण्यात येते.
तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत गाव हगणदारी मुक्त होण्यासाठी विविध प्रकारचे बक्षीस ग्रामपंचायत ला देऊन हगणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न चालविल्या जातात. परंतु अनेक गावांत अनेक कुटुंबांना सौचालयाचा लाभ देण्यात येऊनही तालुक्यातील अनेक ठिकाणी हगणदारी संपुष्टात आल्याचे दिसत नाही. अनेक गांवांत प्रवेश करताना हगणदारी चे ठिकाने असल्याने दुर्गंधी वाढीस लागली आहे.
या सह हगणदारी मुक्त फलक लावलेले आढळते. मात्र बर्याच ठिकाणी नागरिकांच्या हातात टमरेल घेऊन बाहेर सौचास जाण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. अनेक नागरिकांच्या घरी सौचालय व्यवस्था असताना सूद्धा हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी ग्रामस्थ दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणी ग्राम पंचायत तर्फे उपाय योजना केल्या जात नाही.
तालुक्यातील ग्रामपंचायती च्या दुर्लक्षीत धोरणामुळे काही ग्रामस्थांच्या हातातील टमरेल सुटता सुटत नाही. यावर प्रशासनाच्या वतीने प्रभावी धोरण अवलंबून गाव शेजारी घाणीचे साम्राज्य कमी करता येईल अशा उपाययोजना राबविणे गरजेचे झाले आहे.