अखेर तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला मिळाला रस्ता.

अखेर तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला मिळाला रस्ता.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

शेतकरी म्हटले की शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आवासून उभ्या असतात अस्मानी संकटाचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो त्यातही शेतमालाला भाव मिळत नाही कधी यात अस्मानी संकट तर कधी निसर्गाची अवकृपा शेतमालाला मिळत नसलेला भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे असताना भुलाई येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव कथले यांच्या शेतीचा वहिवाटीचा रस्ता शेत गट क्रमांक 106 च्या धारकाने अडविल्यामुळे त्यांना आपली शेतजमीन पडीत ठेवण्याची पाळी आली.

शेत जमिनीमध्ये जाण्याकरिता वहिवाटीचा रस्ताच नसल्याने पांडुरंग आनंदराव कथले यांना आपल्या शेतमालापासून वंचित राहावे लागले त्यांना पेरणी सुद्धा करता आली नाही त्यामुळे त्यांनी व्यथित होऊन दारव्हा तहसील कार्यालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले या प्रकरणाची चौकशी तलाठी मंडळ अधिकारी यांनी करून सदरचा अहवाल तहसीलदार दारवा यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर सदर प्रकरणाची केस चालवून दारव्हा तहसीलचे नायब तहसीलदार आर के तूपसुंदरे यांनी दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी रस्ता मोकळा करण्याबाबत आदेश देऊनही सदर शेत गट धारकाने रस्ता वापरण्यास मज्जाव केला.

व एन केन प्रकारे रस्ता अडवून पांडुरंग आनंदराव खतले यांची अडचण निर्माण करीत होते त्यामुळे तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी पोलीस संरक्षण घेऊन शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांच्याकडून पोलीस संरक्षण पुरविण्यात आले तहसीलदार विठ्ठल कुंबरे नायब तहसीलदार संजय जाधव मंडळ अधिकारी गुल्हाने तलाठी मिश्रा मॅडम यांच्यासह.

पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी नम्रता राठोड रामराव राठोड यासह अनेक पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रस्ता मोकळा करण्यात आला सदर प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अंबादास उंबरे यांनी विशेष सहकार्य केले तहसील कार्यालयात मामला चालविण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञतज्ञ ऍड अनिल धवस ऍड कौस्तुभ भिसे यांचे मार्गदर्शन लाभले तहसीलमध्ये मामल्याचे कामकाज संघराज खंडारे यांनी पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − twenty =