Darwha Tehsil कार्यालयात लघुशंकेचे वांधे!नागरिकांनाच काय काही कर्मचाऱ्यांनाही उघड्यावर उरकावा लागतो कार्यभार.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
ठळक मुद्दे : Darwha Tehsil
*एका वर्षांपासून स्वच्छालयास कुलूप.
*नागरिक उदघाटनाच्या प्रतीक्षेत.
दारव्हा: संपूर्ण तालुक्यातून नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. त्यांच्यापासून लाखो रुपयाचा महसूल शासणास मिळतो परंतु शासनाने स्वच्छतागृहाची व्यवस्था करून दिली असून सुद्धा तहसील प्रशासनाला साधे उदघाटन करणे जमत नाही. तहसील कार्यालयात नवीन स्वच्छता गृहाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. परंतु काय कारणास्तव स्वच्छता गृहाला कुलूप ? असा संतप्त सवाल शहरातील व तालुक्यातील नागरिकांकडून केला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विशेष प्रकल्प (सा बां) विभाग, यवतमाळ सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२०- २१ अंतर्गत स्वच्छालयाचे मंजुर बांधकाम दिलेल्या तीन महिन्याच्या कालावधीत करण्यात आले.दारव्हा तहसील कार्यालयामध्ये महिला व पुरुषा करीता हे स्वच्छालंय बांधण्यात आले आहे.कामाची अंदाजीत किंमत : रु.६८८७५६/- एवढी आहे. असे असूनही एका वर्षांपासून एवढ्या रुपयाची शासनाची मालमत्ता आज धूळ खात बसलेली आहे.ह्याचे कारण काय तर या स्वच्छालयाचे उदघाटन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते व्हावे म्हणून या स्वच्छालयाला कुलूप लावून ठेवण्यात आले आहे. अशी चर्चा तालुक्यात आणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
याआधी शहरातील काही युवकांनी ह्या स्वच्छालयाचे मोठ्या थाटात नपुसंकलिंगी व्यक्ती च्या हस्ते कुलूप न तोडता उदघाटन केले होते.अशा आशयाचे वृत्त झळकल्यानंतरही तहसील प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. कार्यालयातील अधिकारी आणी काही कर्मचाऱ्यांसाठी मात्र व्ही. आय. पी. स्वच्छतालय आणि सामान्य नागरिकांना आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागते. ठीक आहे.
पुरुषमंडळी उघड्यावर लघुशंकेला जातात परंतु स्त्रियांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. पुरुष मंडळी तहसील कार्यालयातील दस्त नोंदणी कार्यालयाच्या बाजूला लघुशंकेला जातात त्यामुळे दुय्यमनिबंधक कार्यालयाच्या बाजूला घाणीचे सम्राज्य पसरलेले आहे. तरी,तहसीलदार विठ्ठल कुमरे साहेब यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. एकीकडे नागरिकांना स्वच्छतेचे धडे द्यायचे अन् दुसरीकडे आपल्या प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उघड्यावर पाठवायचे हे कुणालाही पटणारे नाही..त्यामुळे तहसीलदार महोदय, बघा तुमच्याकडून जमते का.