*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
बंजारा भजन मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त १० फेब्रुवारी रोजी नवीन बंजारा भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा भजन मंडळीनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन बंजारा भजन स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष ईश्वर राठोड यांनी केले आहे. शेलोडी येथे यावर्षी पहिल्यांदाच बंजारा भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये भजन मंडळाकरिता प्रथम बक्षीस १० हजार रुपये रोख तर व्दितीय बक्षीस ७ हजार व तिसरे बक्षीस ५ हजार.
चतुर्थ बक्षीस ४हजार रुपये पाचवे बक्षीस ३ हजार रुपये असे एकूण विस बक्षिसांची लयलूट करण्यात आले असून, स्पर्धेचे उद्घाटन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांचे शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत जानुसिंगजी महाराज तर प्रमुख उपस्थितांमध्ये संजय जाधव नायब तहसिलदार,ह.भ.प.मोहनदास महाराज चव्हाण,ह.भ.प.सुखदेव महाराज,ह.भ.प.जयराम महाराज,ह.भ.प.दयाराम महाराज.
उकंडसिंग राठोड,जगदीश जाधव अध्यक्ष आत्मा समिती दारव्हा,लहुजी चव्हाण माजी सैनिक,अरुण जाधव अध्यक्ष ग्रामसेवक संघटना दारव्हा, देवानंद इरेगावकर ग्रामसेवक आदींची उपस्थिती राहणार आहे. या भजन स्पर्धेचा लाभ परिसरातील भजन मंडळींनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.