संत श्रावण बाबा शिवरात्रोत्सवास सुरूवात.

संत श्रावण बाबा शिवरात्रोत्सवास सुरूवात.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

बोधगव्हाणमध्ये ४९ वर्षांपासून यात्रोत्सव, आजपासून भागवत सप्ताह.

संत श्रावण बाबांचे समाधी मंदिर दारव्हा तालुक्यातील बोधगव्हाण येथे आहे. या ठिकाण संत श्रावण बाबा यांनी ४९ वर्षांपासून शिवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती. यंदाच्या या यात्रा महोत्सवास रविवार, दि. ३ मार्च रोजीपासून सुरूवात झाली. या ठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भक्तांची मांदियाळी राहते. दारव्हा तालुक्यातील बोधगव्हाण ही संतांची भूमी आहे.

संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याने ही भूमी पावन झाली आहे. याच थोर संतांच्या विचारधारांसमोर घेऊन जाणारे आधुनिक संत श्रावण बाबा यांनी समाजामध्ये समता, एकात्मता, आपलेपणाची भावना निर्माण होण्याकरिता आयुष्यभर प्रयत्न केले. वयाचे १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तपोभूमी आणि कर्मभूमी असलेल्या बोधगव्हाण येथे आपली जीवन यात्रा थांबवली.

संत श्रावण बाबा यांनी ४८ वर्षांपूर्वी शिवरात्र उत्सवाची सुरुवात केली होती. त्यामुळे संपूर्ण विदर्भातून भक्तगण बोधगव्हाण येथे दर्शनाकरीता येतात. सात दिवस चालणारा अखंड हरिनाम सप्ताह, अडाण नदीवरील तपोभूमी येथे होणारा उत्सवाकरिता प्रत्येक भाविक उत्सुक असतो. सदविचार हरिपाठ मंडळाच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ५ ते ६ वाजता काकडी आरती, सकाळी १० ते १२ वाजता आणि दुपारी ३ ते ५ भागवत, तर सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, शेवटी ९ ते ११ वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवार, दि. ३ मार्च रोजी अवधूती भजनी मंडळ, पाथ्रड देवी, सोमवार, दि. ४ मार्च रोजी श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ, निंभा पाथ्रड (देवी) साकूर करमाळा, सावळा, मंगळवार, दि. ५ मार्च उमेश मांढरे महाराज भारूडकार.

झाडगाव, बुधवार, दि. ६ मार्च रोजी युवा कीर्तनकार कु. चेतनाताई महाराज ढोबळे (आळंदिकर) यांचे कीर्तन, शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी ह.भ.प. दादा महाराज कोळसकर (बुलडाणा) यांचे कीर्तन, शनिवार, दि. ९ मार्च रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज (आळंदिकर) यांचे कीर्तन आणि रविवार, दि. १० मार्च रोजी ह.भ.प. विठ्ठल महाराज पुनसे (दुधगाव) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विठ्ठल रुख्मिणी मंदिर व श्री श्रावण बाबा संस्थान, तसेच बोधगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

परजिल्ह्यातील भाविकांची उपस्थिती.

संत श्रावण बाबांच्या विचारांनी प्रेरित झालेली भक्त यवतमाळ, अमरावती, वर्षा, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये विविध सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण विदर्भात संत श्रावण बाबा यांचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 9 =