“दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…” जयघोषात सायखेड मध्ये दत्त जयंती साजरी.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
ठळक मुद्दे
निघालो घेऊन दत्ताची पालखी या स्वराने दुमदुमली सायखेड नगरी, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दत्त जयंती उत्सव.
दारव्हा; दत्त मंदिरांमध्ये केलेली फुलांची आकर्षक सजावट….विद्युत रोषणाईने सजविलेला कळस…गाभाऱ्यात दरवळणारा धूप-अगरबत्तीचा सुगंध…होमहवन अन् कीर्तन भारुडामुळे निर्माण झालेले भक्तिमय वातावरण… दारव्हा शहरासह विविध गावात बुधवारी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्थांतर्फे दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दत्त जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी सर्वच दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच पुजारी आणि भाविकांची लगबग सुरू होती. काही मंदिरामध्ये सकाळी होमहवन, गुरुचरित्र सामूहिक पारायणही करण्यात आले; तर काही ठिकाणी भक्तिसंगीताचा निनाद सुरू होता. झेंडू, शेवंती, मोगरा यांसारख्या वैविध्यपूर्ण फुलांच्या हारांनी मंदिरांचे गाभारे सजविण्यात आले होते.
त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वात मोठा दत्त जयंती उत्सव म्हणून ओळखला जाणारा उत्सव सायखेडा येथील दत्तवाडी येथे दत्त मंदिरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर असे की,सायखेडा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी ९ वाजता दत्तप्रभुुची पालखी ची गावातील सर्व प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बँड पथक, महिला व पुरुषांचे पाच ते साथ भजनी मंडळे आणि दत्त प्रभुची पालखी व गावातील सर्व भाविक मंडळी या पालखीत उपस्थित होते. अशाप्रकारची भव्य दिव्य स्वरूपाची पालखी आणी विशेष म्हणजे महिला भजनी मंडळांनी एका रंगाच्या साड्या परिधान केल्याने आणी छोट्या मोठ्या मुलींनी साड्या व नऊवाऱ्या धारण केल्याने वेगळेच आकर्षण या पालखी सोहळ्यास निर्माण झाले.
पालखी पूर्ण ग्राम प्रदक्षिणा करते वेळेस प्रत्येक घरी पालखीचे पुजन करण्यात आले. ज्या ज्या मार्गांवरून पालखी जाते,त्या त्या मार्गांवर आकर्षक अश्या रंगेबिरंगी रांगोळ्या काढून होत्या. अशाप्रकारे पालखी पूर्ण ग्राम प्रदक्षिणा करून दत्त मंदिरात परत आली.आणी मग काल्याचे कीर्तन अवधूती भजनातून झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात झाली. आणि गावातील सर्व नागरिकांनी व परगावतील शेकडो लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
अशाप्रकारे हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच श्री. दत्ताभाऊ काळे, शिवसेना महागाव सर्कल प्रमुख प्रमोदभाऊ यंगड, सोमनाथ जाधव, गोपाल हिवराळे, नामदेव दुपारते,गणेश राठोड, दादारावजी उघडे,रमेश घोडे,रमेश राठोड, दिपक इंगोले,जनार्धन जोगदंड,सुधिर झोंबाडे,गोपाल जोगदंड,प्रवीण तायडे, हरचंद जाधव, विकास काळे,गोपाल रुडे, देवानंद वाणी, प्रवीण हिवराळे, प्रमोद तायडे,गोलू दुपारते,उत्कर्ष तायडे,सागर वाघमारे,संतोष रुडे, शंकर आडे,रवि राठोड, सचिन तायडे,पवन उघडे,व गावातील सर्व भाविक लोकांनी आणी युवकांनी या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केले.
कार्यक्रमाची धुरा सोमनाथ जाधवांच्या हाती स्व. अवधूतरावजी जाधव यांच्या संकल्पनेतून दत्त मंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी हा कार्यक्रम गावातील चिर परिचित व्यक्तिमत्व श्री. दत्ताभाऊ काळे यांच्या सहकार्याने सुरु केला होता. तेव्हा पासून हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्व. अवधूतराव जाधव यांच्या पच्च्यात या कार्यक्रमाची धुरा दत्तभाऊ काळे यांनी स्व.अवधूतरावांचे जेष्ठ चिरंजीव श्री. सोमनाथ जाधव यांना घेऊन सांभाळत आहे.
– गोपाल हिवराळे
अध्यक्ष, एकता सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ (दत्तवाडी),सायखेड