*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाचा समितीने घेतला आढावा.
दारव्हा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत दारव्हा आगाराच्या बसस्थानकातील स्वच्छतेची तिसऱ्यांदा लातूर विभाग नियंत्रण समितीकडून पाहणी करण्यात आली आहे. नियंत्रण समितीने सोमवार, दि.८ जाने रोजी दारव्हा आगाराला भेट देत आगारात राबवलेल्या स्वच्छता व विविध उपक्रमाची पाहणी करत आगाराच्या कामकाजाचा आढावा समितीने घेतला.
विभाग नियंत्रण समितीचे लातूर विभाग नियंत्रक अश्र्वजीत जानराव यांच्या अध्यक्षतेखालील व यंत्र अभियंता जफर कुरेशी, कामगार अधिकारी प्रदीप सुतार यांच्यासह समितीत स्थानिक पत्रकार विशाल चव्हाण, प्रवासी मित्र इम्रान खान यांचा समावेश आहे. आगार प्रमुख नितीन उजवने यांनी विभाग नियंत्रण समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. यानंतर समितीने आगारातील परिसर, सुलभ शौचालय,एसटी बसची स्वच्छता, प्रवाशांच्या सेवा सुविधा यांची पाहणी केली.
बसस्थानकाची स्वच्छता, सेल्फी पॉइंट याची खातरजमा करून घेतली. कर्मचाऱ्यांच्या अडचणी व आरोग्य यासह इतर कामकाजाची माहिती घेतली. तसेच बस बसस्थानक परिसर डागडुजी व रंगकाम याबद्दल समाधान व्यक्त केले.जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करावा, यासाठी स्वच्छता अभियान यावर भर देण्यात येत आहे. बसस्थानकातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी बसस्थानक परिसर, स्वच्छतागृह, बसची स्वच्छता, सुशोभीकरणाची कामांची विभाग नियंत्रण समितीने पाहणी केली आहे.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत समितीने गुणांकन करून राज्यस्तरावर अहवाल सादर करणार आहे.यावरून स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत राज्यस्तरावर पुरस्कार दिल्या जाणार आहे. यावेळी आगार व्यवस्थापक नितीन उजवणे यांच्यासह आगारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.