दारव्हा तहसीलीत ‘Maratha-Kumbi’ जातीच्या फक्त १० नोंदी.

दारव्हा तहसीलीत ‘Maratha-Kumbi’ जातीच्या फक्त १० नोंदी.

दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Maratha-Kumbi; सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. जरांगे यांनी जवळपास दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मध्यंतरी शासनाला त्यांनी मराठा आरक्षण सरसकट लागू करण्यासाठी मुदत दिली होती.

शासनाने मात्र दिलेल्या मुदतीत त्यांची मागणी पूर्ण केलेली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत.

या मुद्द्यावर नुकत्याच सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मराठ्यांना टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सहमती झाली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाईल अशी घोषणा केली आहे. वंशावळीत कुणबी उल्लेख असलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

याचा जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे. मात्र जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या मागणीवर ठाम आहेत. महसूल, ग्रामपंचायत, शिक्षण, पोलिस अशा सर्वच शासकीय विभागाकडील १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत पाच कोटींपर्यंत दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात चार लाखांवर नोंदी आढळल्या आहेत.

वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने कागदपत्रांसह तहसीलदारांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही देखील सुरु आहे. त्या अनुषंगाने दारव्हा तहसील प्रशासनाने ८ लाख ९६ हजार ६०७ नोंदी तपासल्या त्यापैकी ९९ हजार १५० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आणि ‘मराठा-कुणबी’ १० नोंदी. अशाप्रकारे दारव्हा तहसील प्रशासनाला ८ लाख ९६ हजार ६०७ नोंदी पैकी फक्त १० नोंदी ‘मराठा-कुणबी’ जातीच्या शोधण्यात यश मिळाले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − three =