*बाभुळगांव ता,प्र मोहम्मद अदीब*
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, उमेद व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ १ यांच्या संयुक्त विद्यमाने अझोला तयार करण्याविषयी प्रात्यक्षिकाचे आयोजन दाभा तालुका बाभुळगाव येथे दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रामुख्याने महिला पशुपालक यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमा मध्ये रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा चे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल बनसोड यांनी मार्गदर्शन केले.
यांनी अझोला तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, त्यानंतर अझोला तयार करण्याची कृती तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले त्यानंतर अझोला तयार झाल्यानंतर तो जनावरांना कशा पद्धतीने खाऊ घालायचा त्यामध्ये असणारे घटक आणि त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. अझोला जनावरांना दिल्यामुळे ढेपेवरील होणाऱ्या खर्चामध्ये निश्चितच बचत होते. अझोला हा केवळ मोठ्या जनावरांना ना देता शेळी, गाई, म्हशी व कोंबड्या इत्यादी सर्व पशुंना खाद्यामध्ये मिसळून देता येतो.
ज्यामुळे जनावरांच आरोग्य सुधारतं व दुधामध्ये तसेच कोंबड्यांच्या अंड्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत मिळते आणि हा अझोला तयार करण्यासाठी घरच्या घरी कुठल्याही खर्च न करता आपण तयार करू शकतो तसेच त्या माध्यमातून आपल्याला चांगला एक फायदा पशुपालकांना होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक आज रोजी तज्ञांनी मार्गदर्शनाच्या माध्यमातून व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पशुपालकांना दिला.
यावेळी गावातील २० महिला पशुपालकांनी अझोला युनिट तयार करण्याचे मान्य केल्यामुळे त्वरीत ५ किलो अझोला मोफत वाटप करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने बलवंत कांबळी सर तालुका अभियान व्यवस्थापक उमेद प्रकल्पातील पशु सखी पुष्पा पेटकुले, कविता परोपटे, कृषि सखि उमेद प्रकल्पातिल कॅडर योगराज लांडगे पशुधन व्यवस्थापक उमेद सावर प्रभाग यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विशेष सहकार्य केले.