Cyber Fraud : BSNL ग्राहकांना KYC साठी 24 तासांचा अलर्ट ! जाणून घ्या,काय आहे फसवणुकीचा नवा प्रकार ?

Cyber Fraud : देशभरातील बीएसएनएल सिम ग्राहकांना नुकतीच एक महत्त्वाची पण तशीच चिंतेत टाकणारी बातमी समोर आलेली आहे.बीएसएनएल च्या नावाने सीम ग्राहकांना 24 तासात आधार Kyc करण्याची नोटीस फिरताना दिसत आहे.यात 24 तासात सिम अकाउंट नंबर सोबत आधार लिंक न केल्यास सिम सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात येत आहे.{Bharat Sanchar Nigam Limited}.

यासाठी BSNL ग्राहकांना SMS किंवा Calls करून माहिती OTP पाठवून ती शेयर करायला सांगितले जात आहे.पण या संदर्भात सरकारी दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएल ने आपल्या ग्राहकांना मिळणाऱ्या या नोटीस संदर्भात आपले स्पष्टीकरण जारी केलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

यामुळे BSNL SIM ग्राहकांना मिळणारी ही नोटीस फसवणुकीचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.बीएसएनएल आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आता KYC संदर्भात बीएसएनएल आपले स्पष्टीकरण आणि ग्राहकांना Cyber Fraud पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Fake Calls,SMS माध्यमातून बनावट नोटीस.

मागील काही दिवसांपासून बीएसएनएल आणि TRAIच्या {Telecom Regulatory Authority Of India} नावाने सिम कार्ड सोबत आधार लिंक करण्यासाठी केवायसी अपडेट करण्याची मागणी करणारे संदेश BSNL ग्राहकांना मिळत आहे.बीएसएनएल ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या या मेसेज द्वारे असे संदेश देण्यात येत आहे की जर त्यांनी 24 तासांच्या आत केवायसी अपडेट केली नाही तर तर सिम कार्ड सेवा पूर्णतः बंद केली जाईल.दरम्यान बीएसएनएल कडून फिरणारे हे संदेश आणि माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे BSNL ने स्पष्ट केले आहे.

Cyber Fraud : सायबर क्राईमचा प्रकार.

BSNL नुकतेच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे,यात आमची नॅशनल टेलिकॉम कंपनी अशा प्रकार आपल्या ग्राहकांना कोणतीही नोटीस पाठवीत नसून,यामागे सायबर क्राईम आणि त्यात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांचा हात असू शकतो,अशी शक्यता BSNL कडून Message जरी करून करण्यात आली आहे.हे सायबर गुन्हेगार असे मेसेज पाठवून आणि OTP पाठवून त्याला परत मागतात आणि यातून ग्राहकांची पर्सनल इन्फॉर्मेशन चोरी करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

KYC अपडेट फसवणुकीसाठी असा होत आहे OTP फ्रॉड.

उल्लेखनीय म्हणजे KYC चे नावावर फसवणुकीचा हा नवा प्रकार सायबर गुन्हेगारांनी अवलंबविला आहे.यात Sim ग्राहकांना त्यांचा Sim KYC न केल्यास 24 तासांच्या आत बंद पडण्याची माहिती देवून टेलिकॉम ग्राहकांना फसवणूक करतात.यासाठी ग्राहकांना फोन करून किंवा SMS पाठवून OTP शेअर करण्यास सांगतात.हा ओटीपी फ्रॉड फसवणुकीचा प्रकार आहे.

असे कॉल करणाऱ्यास प्रतिसाद देताना आणि ओटीपी दिल्याने सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांच्या बँक खाते Details,व्यक्तिगत आणि इतर महत्त्वाची माहिती वर ते नियंत्रण मिळवू शकतात.यादरम्यान ते आपल्या बनावट केवायसी अपडेट वेबसाईटवर ग्राहकांना लॉगिन करण्यास सांगतात,असे केल्यास ग्राहकांची माहिती तात्काळ चोरी होते.

सध्या बीएसएनएल ग्राहकांना 24 तासात केवायसी करण्याचे जे संदेश मिळत आहे,ते अश्याच फसवणुकीचा भाग असून,बीएसएनएल आणि TRAI ने यासंदर्भात सूचना जारी केल्या आहे.अशा कॉल्स आणि मेसेजवर ग्राहकांनी कोणताही विश्वास न ठेवता त्यांना प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे.

बीएसएनएल ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आणि उपाय.

  • टेलिकॉम ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी नंबर वरून येत असलेल्या केवायसी अपडेट कॉल्स आणि मेसेजवर कोणताही विश्वास ठेवू नये.
  • सायबर गुन्हेगारांकडून तात्काळ पाठविण्यात आलेल्या OTP,बँकेची डिटेल किंवा माहिती कोणासोबतही शेअर करू नये.
  • महत्त्वाचे म्हणजे बीएसएनएल कडून KYC साठी इतर महत्वाची माहिती आपल्या ग्राहकांना देण्यासाठी,BSNL कंपनीचे अधिकृत संदेश आणि सूचना आपल्या अधिकृत वेबसाईट वरील ग्राहक सेवा केंद्र आणि अधिकृत बीएसएनएल एप्लीकेशन द्वारे दिले जाते.
  • बीएसएनएल ग्राहकांना अशाप्रकारे कोणताही संशयास्पद SMS किंवा Calls मिळाले असलयास बीएसएनएल ग्राहक सेवा क्रमांक वर संपर्क साधून याची अधिकृत माहिती घ्यावी.
  • सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडण्यातून स्वतःला वाचविण्यासाठी सतर्क रहावे.असे आव्हान बीएसएनएल ने केले आहे.

फसवणूकीसाठी Cyber गुन्हेगार वापरतात नवीन युक्त्या.

अश्या प्रकारे फसवणूक करणारे Cyber Criminals लोकांना फसवण्यासाठी सतत नवीन युक्त्या विकसित करत राहतात. यासाठी ते अनेकदा फोन कॉल,मेसेज किंवा ईमेलद्वारे वापरकर्त्यांना धमकावतात, त्यांना आधार कार्ड तपशीलांसारखी संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी दबाव आणतात.यानंतर ग्रःकानाच्या या माहितीचा गैरवापर करून त्यांची फसवणूक केली जाते.

यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.त्यामुळे आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि दूरसंचार विभाग (DOT) आणि BSNL वेळोवेळी SIM वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचा आणि अशाप्रकारे बनावट धमक्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत आहे.कोणतीही Telecom Company आणि SIM संकॅहाल्न करणारी एजन्सी वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर निष्क्रिय करण्यासाठी कॉल करत नाही किंवा SMS नोटीस पाठवत नाही.

फसवणुकीसाठी “कॉल मर्जिंग” नवीन तांत्रिक पद्धती.

अश्या प्रकारच्या फसवणूक साठी सायबर गुन्हेगार “कॉल मर्जिंग” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करून OTP फसवणूकीसाठी सक्रिय आहेत.या माध्यमाने पीडितांना त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून येणारे कॉल मर्ज करण्यास सांगितले जाते.

एकदा कॉल मर्ज झाले की, असे Cyber गुन्हेगार सहजपणे ते ऐकू शकतात आणि फसव्या हेतूंसाठी कोणत्याही शेअर केलेल्या OTP चा वापर करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.