Cyber Crime: सायबर घटने पासून सर्वांनी सावध रहावे – ठाणेदार सुनील हुड

Cyber Crime: सायबर घटने पासून सर्वांनी सावध रहावे – ठाणेदार सुनील हुड

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Cyber Crime: हल्ली सायबर गुन्हाचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या पासून सर्वांनी सावध राहवे व जणजागृती करून इतरांनाही  सावध करावे. तसेच सोशीयल मिडीयावर  कोणतीही आक्षेप असणाऱ्या पोस्ट टाकून नये याकडे सर्वांनी कटाकक्षाने लक्ष द्यावे. जेणे करून गावातील वातावरण खराब होणार नाही. गावात कुठल्याही वादाच्या घटना घडल्या तर पोलिसांना सांगून आपण मिटू शकतो व येणारी शिवजयंती  व सण कोणतेही गालबोट न लावता उत्साहाने साजरे करावे असे मत बाभूळगाव येथील ठाणेदार Sunil Hood यांनी व्यक्त केले.

शिवजयंती निमित्त दि.16फेब्रुवारीला बाभूळगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात शांतता समितीची मीटिंगचे आयोजन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ठाणेदार हुड हे बोलत होते. हुड यांनी त्यांच्या पोलीस कारर्गिदित आलेल्या गुन्हांचे उदाहरण देऊन  त्या व्यक्तीला कन्सालिंग करून त्या गुन्ह्यातून कसे रोखण्यात आले. असे अनेक उधारण दिले.पती-पत्नी, भावा  भावाचे वाद असे वाद तुम्ही त्यांना कन्सलिंग करून मिटवू शकता असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

यावेळी शांतता समितीचे सदस्य प्रकाश छाजेड, भारत इंगोले,आरिफ अली, अभय तातेड जमादार राठोड यांनी सूचना स्पर भाषणे झाली. या सभेला प्रकाश छाजेड, भारत इंगोले , नगरसेवक अनिकेत पोहोकार,नगरसेवक सुरेश वर्मा, नगरसेवक शेख.अहेमद,नगरसेवक अभय तातेड, आरिफ अली, राजू  नवाडे,सागर परडखे,अंकुश सोयाम, प्रदीप नांदुरकर, शहेजाद शेख,मिलिंद नवाडे, अयुब पठाण ,राजू फसाटे, अक्षय राऊत, आदी शांतता कमिटीचे सदस्य व शिवजयंती कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 7 =