Cyber Crime : मी भारतीय सैनिक बोलतोय असे ऐकल्याने भावूक होवू नका, हा नविन फ्रॉड वापरुन नागरिकांची फसवणुक.

Cyber Crime : पूर्वीदेखील भारतीय सैनिकांच्या नावाने नागरीकांची फसवणुक सुरु होती परंतु आता सायबर गुन्हेगारांनी एक नविन फंडा नागरीकांना फसवण्यासाठी शोधला आहे. त्यात हे सायबर गुन्हेगार मी भारतीय सैन्यातून एक आर्मी ऑफीसर बोलतोय असे समोरील व्यक्ती आपल्याला भासवते आणि ती अज्ञात व्यक्ती आपल्याला सांगते आणि तिथेच आपली फसवणूक होते. अनेक माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आता भारतीय सैनिकांच्या नावाने नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या मध्ये भारतीय सैनिक असल्याचे भासवून मला आजाराच्या उपचारासाठी आपल्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे किंवा ती व्यक्ती आपल्याला असे देखील सांगते की मला मुलगा झाला आहे, मी आपल्या परिसरातील मंदिराकरीता काही रक्कम दान करु इच्छितो आणि आपल्याला आपल्या फोन पे, गुगले पे नंबर ओपन करण्यास सांगतात आणि आपल्याला विविध प्रकारच्या लिंकवर क्लिक करा.

अशा वेगवेगळया पध्दतीने आपल्याला गुंतववून आपले बँक रिकामे करण्याचा प्रयत्न करतात. आपण त्या अज्ञात व्यक्तीला भारतीय सैनिकांच्या नावाने मदत म्हणून पैसे पाठवून देतो आणि इथेच आपण फसतो कारण आपण भारतीय सैनिक नाव ऐकताच भावून होवून जातो कारण आपण भारतीय आहोत आणि जर आपल्या देशाच्या सैनिकाला कुठलीही मदतीची आवश्यकता असेल किंवा त्याला कुठल्या प्रकारचे दानधर्म करायचे असेल तर आपण त्वरीत त्यांना होकार देतो आणि तेथेच आपण फसतो.

म्हणून नागरीकांना नम्र विनंती आहे की अशा प्रकारचे भारतीय सैनिक किंवा आर्मी ऑफिसर सामान्य नागरीकांना फोन करत नाही त्यांचा नावाचा व फोटोचा दुरुपयोग करून समोरील सायबर गुन्हेगार सामान्य नागरीकांची फसवणुक करीत आहे.

जर आपल्याला भारतीय सैनिकांचा नावाने फोन आलेले असेल तर त्याला प्रतिसाद देवू नका त्यांनी जरी आपल्याला भारतीय सैनिक असल्याचे पुरावे आपल्या व्हॉटस अॅपवर पाठवले असतील तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण हे सर्व खोटे पुरावे हे सायबर गुन्हेगार बनवून नागरीकांची फसवणुक करतात. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे अशी प्रतिक्रिया सायबर तज्ञ ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

one × four =