Crop Insurance: शेती पिकांचे मोठे नुकसान: पण सर्वेक्षणच नाही.

Crop Insurance: शेती पिकांचे मोठे नुकसान: पण सर्वेक्षणच नाही.

Crop Insurance कार्यालयाला मनसेने ठोकले कुलूप.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

वणी: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडून १ रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे वणी मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानीची विमा कंपन्यांकडून अद्याप पाहणी आणि पंचनामेच करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेले नाहीत.

याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू उंबरकर यांनी बुधवारी आक्रमक पावित्रा घेत या कार्यालयाला कुलूप ठोकले. पीक विमा लवकरात लवकर द्यावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही उंबरकर यांनी कंपनीला दिला. मनसे नेते राजू उंबरकर बुधवारी मतदारसंघाचा दौरा करत असताना तालुक्यातील पीक विम्याची समस्या जाणून घेतली.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी संबंधित कंपनीकडून पंचनामेच झालेले नाही, तर जिल्ह्यात काहींच्या खात्यावर १० रुपये अशी शुल्लक रक्कम तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. या विषयाची तात्काळ दखल घेत उंबरकर यांनी शेतकऱ्यांसह मारेगाव येथील रिलायन्स पीक विमा कंपनीचे कार्यालय गाठले.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी पदवीधर किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी या कंपनीकडून पदवीधर व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले युवक नियुक्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य या प्रतिनिधींना नसल्याने कंपनीकडून योग्य ते पंचनामे करण्यात आले नाही.

परिणामी, काही शेतकऱ्यांना १० रुपये, १०० रुपये अशी मदत मिळाली तर काही शेतकऱ्यांना मदतच मिळाली नाही. त्यामुळे हा विमा मिळावा यासाठी राजू उंबरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थानिक कार्यालयातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसल्याने या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला.

यावेळी मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रूपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, वसंता घोटेकार, उदय खिरटकर, शेख नबी, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, संतोष राठोड, लकी सोमकुंवर, मयूर घाटोळे, सूरज काकडे, धीरज बगवा उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − one =