मळसूर : कूलरचा शॉक लागून शेतकरी पुत्राचा मृत्यू मळसूर येथील घटना.

मळसूर : कूलरचा शॉक लागून शेतकरी पुत्राचा मृत्यू मळसूर येथील घटना.

कूलरचा शॉक लागून शेतकरी पुत्राचा मृत्यू ,मळसूर येथील घटना.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)

मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथील शेतकरी पुत्राला कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ११ मे रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजता घडली. नितीन गजानन वानखडे (३८) हे मंडप व्यवसाय करीत होते. मळसूर गावात १२ मे रोजी एक विवाह होता. त्यामुळे ११ मे रोजी मंडप डेकोरेशनचे काम पूर्ण करून ते घरी गेले.घरातील कूलर बंद पडले म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला व कूलर त्यांच्या अंगावर पडला. विजेचा जोरदार झटका बसल्यामुळे ते जागेवर बेशुद्ध पडले.

ही घटना त्यांचे वडील व पत्नीच्या लक्षात येताच विद्युत पुरवठा बंद केला आणि गावातील काही तरुण मंडळीच्या मदतीच्या साह्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले. मात्र, त्यांचा अकोला पोहोचण्यापूर्वी वाटेतच मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असा आप्त परिवार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 14 =