Construction Workers Yojana : महाराष्ट्र शासनाने आता बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत घरगुती भांडे संच वाटप योजना आणली आहे, हे कामगारांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या दैनंदिन कामात योगदान देणार आहे. याअंतर्गत सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयात हा भांडी संच मिळणार आहे.
कामगाराच्या कुटुंब आणि त्याला कामाच्या ठिकाणी वापरासाठी 30 विविध प्रकारची घरगुती भांडी आणि सुरक्षा किट या योजनेतून प्रदान केली जाणार आहे. महाराष्ट्रात ही योजना कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून, याचा मुख्य उद्देश कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे.
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये.
या योजनेमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांची निवड करण्यात येते.अर्ज केल्यानंतर प्रत्येक लाभार्थी कामगाराला दैनंदिन वापरासाठी 30 विविध प्रकारची भांडी संच दिली जाते. शिवाय,कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सरकारकडून या योजनेतूनच विशेष सुरक्षा किटही देण्यात येते.
या सुरक्षा किटमध्ये Safety Kit हेल्मेट, सुरक्षा चष्मे, दस्ताने आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणांचा यात समावेश असेल.विशेष म्हणजे बाजारात सर्व सामग्रीची बाजारातील किंमत खूप जास्त असल्याने ती खरेदी करणे कामगारांना आर्थिकरित्या परवडत नाही,त्यामुळे सरकार सर्व बांधकाम कामगारांना ही किट याच योजनेत फक्त एका रुपयात उपलब्ध करून देत आहे.
काय आहे पात्रता आणि नोंदनी कशी कराल.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.यासाठी कामगारांकडे आपले आधार कार्ड, बँक खात्याची पासबुक मधील माहिती, रहिवासी पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे राहणार आहे.ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. एकदा नोंदणी झाल्यानंतर, कामगार या योजनेसह इतर अनेक शासकीय कल्याणकारी योजनांचासुद्धा लाभ घेऊ शकतात.गेल्या 12 महिन्यांमध्ये कामगाराने 90 दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले पाहिजे.ही या योजनेत एक महत्वाची अट आहे.
नोंदणीकृत बांधकाम कामगार खालील लिंक वर क्लिक करून या योजनेची माहिती आणि अर्जासाठी फॉर्म अपलोड करू शकतात : www.mahabocw.in
Construction Workers Yojana नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- बोर्डमध्ये नोंदणी करण्यासाठी, फॉर्म -V भरावा लागेल आणि खालील कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल.
- कामगार 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावा.
- वयाचा पुरावा
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखीचा पुरावा
- 3 पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
- नोंदणी शुल्क – रु. १/- आणि वार्षिक वर्गणी – रु. १/-
कामगारांचा चांगला प्रतिसाद.
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात बांधकाम कामगारांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा कामगार कल्याण विभागाचे अधिकारी स्तरावर दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत राज्यात लाखो कामगारांनी या योजनेखाली आपली नोंदणी केलेली आहे.
या कामगारांचे अर्ज स्वीकारून त्यांना भांडी आणि सुरक्षा किट वाटप करण्याचे शासकीय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्यात किट वाटप शिबिर सुरू करून बांधकाम कामगारांना तिकीट प्रदान करण्याचे काम सुरू झाले होते मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसहिता लागतात हे काम थांबविण्यात आले होते आता याला पुन्हा सुरुवात होणार आहे.
सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या भांडी आणि सुरक्षा किट वाटप योजनेच्या अंमलबजावणीवर विलंब झाला आहे. आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे.त्यामुळे कामगार कल्याण मंत्र्यांच्या नियुक्तीनंतर या योजनेची पुन्हा अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या कामगारांचे लक्ष आता याचे अंमलबजावणीवर लागलेले आहे.
इतर कामगार कल्याणकारी योजनांसोबत लिंकअप.
महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी ही योजना सुरू केल्यानंतर आता कामगारांना शासनाच्या इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही योजना इतर योजना सोबत संलग्नित करण्यात आलेली आहे यातून आता नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या पाल्यांसाठी स्कॉलरशिप वैद्यकीय मदत, पाल्यांचे शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रसूची लाभ अधि योजनांचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून कामगारांसाठी या सर्व योजना 100% अनुदान तत्वावर राबविल्या जात आहे त्यामुळे बांधकाम कामगारांना आर्थिक स्वरूपात याचा लाभ होत आहे.
राज्यात व्याप्ती वाढणार.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांनी मोफत भांडी संच आणि सुरक्षा किट मिळविण्यासाठी नियमानुसार अर्ज केले होते यानंतर आता त्यांना योजनेतील सामग्री वाटप करण्याची कारवाई सुरू होणार आहे. सोबतच नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडून नवीन सुद्धा स्वीकारण्यात येणाऱ्या त्यामुळे महाराष्ट्राच्या योजनेची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी राज्यात आता विशेष मोहीम हे राबविली जाणार असून याशिवाय महाराष्ट्र कामगार मंत्रालयाद्वारे या योजनेच्या अंमलबजावणी पारदर्शिता अधिक सुधारणा आणि कामगारांसाठी नवीन सुविधांची घोषणा होऊ शकते अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
विशेष माहितीनुसार 2001 च्या जनगणनेनुसार, राज्यात एकूण 14.09 लाख बांधकाम कामगार आहेत. मात्र याची अधिकृत आकडेवारी सरकारकडून अद्यापही जाहीर झालेली नाही.मात्र राज्यात एकूण लोकसंख्येतील 15.99% वाढ लक्षात घेता, बांधकाम कामगार 17.50 लाख असणे अपेक्षित आहे.
नोव्हेंबर 2016 अखेरीस मंडळामध्ये 5.62 लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी झाली होती.यात आता मोठी वाढ झालेली आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2015-16 नुसार, राज्यात तो पर्यंत 1.02 लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात होत्या,त्यातसुद्धा आता वाढ झाली आहे.सध्या कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.