Congress MLA’s : महाराष्ट्रात आधी लोकसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे पक्ष काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस चे पानिपत झाले,मात्र यापूर्वी काँग्रेसमध्ये उत्साह संचारणारा असा तेलंगणा राज्यात विजय प्राप्त केल्यानंतर तेथे काँग्रेस समोर अंतर्गत बंडाळीचे राजकीय चिन्ह दिसत आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही तेथे मनपा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा राजकीय दणका मिळण्याचे संकेत दिसत आहे.मनपा निवडणुकीपूर्वीच तेथील काँग्रेसचे 10 आमदार काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी करीत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे अनेक आमदारांची एका फार्म हाऊस वर गुप्त बैठक झाली असून,यात काँग्रेस पक्ष सोडून या आमदारांनी वेगळा राजकीय निर्णय घेण्याची तयारी केली आहे.
तेलंगाना सरकारात मंत्री पोंगुलेट्टी श्रीनिवास यांच्याविरोधात काँग्रेस आमदारांमध्ये तीव्र नाराजी.
तेलंगाना काँग्रेसमध्ये काँग्रेसचे दहा आमदार पक्ष सोडून मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे, या आमदारांनी तेलंगणामधील एका फार्म हाऊस वर दोन दिवसापूर्वी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तेलंगाना सरकारात मंत्री असलेले पोंगुलेट्टी श्रीनिवास यांच्याविरोधात तेलंगणा काँग्रेसचे अनेक आमदारांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून,यामुळेच या आमदारांनी फॉर्म हाऊस वर गुप्त बैठक घेऊन आपल्या पक्षाविरुद्धच तेलंगाना मधील महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मोठा राजकीय निर्णय घेतला असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.
उल्लेखनिय म्हणजे येत्या काळात तेलंगणा राज्यात विधानपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे.मात्र यापूर्वी काँग्रेसच्या या आमदारांच्या नाराजीने तेलंगाना मध्ये काँग्रेसचे सरकार आणि मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची राजकीय चिंता वाढविणारी ही बाब ठरत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणातील या काँग्रेसच्या नाराज आमदारांना मनविण्यासाठी आणि पक्षात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सीएम रेड्डी यांनी पक्षातील इतर आमदारांची तात्काळ बैठक बोलावली आहे.यात ज्यांच्याविरुद्ध काँग्रेस आमदारांची नाराजी आहे ते मंत्री पोंगुलेट्टी श्रीनिवास यांनाही या बैठकीत उपस्थित राहण्याचे फर्मान बजावण्यात आलेले आहे.
Congress MLA’s : हे आहेत काँग्रेसचे ते 10 नाराज आमदार.
तेलंगणामध्ये सरकारात असलेल्या मंत्री श्रीनिवास यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याने आता पक्षात बंड पुकारून या आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
तेलंगणामध्ये विधान परिषद सदस्य निवडणूक आणि मनपा निवडणुकीपूर्वी आमदारांनी पक्षातून बस्तान मांडण्याचा निर्णय घेतला आहे.तेलंगाना काँग्रेसच्या या नाराज आमदारांमध्ये नैनी राजेंद्र रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी,कुचुकूला राजेश रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी संजीव रेड्डी,मुरली नाईक, लक्ष्मीकांत, बिर्ला इलय्या आणि दोंथी माधव रेड्डी यांच्या समावेश आहे.
तेलंगाना सरकार पडण्याचाही धोका उद्भवला.
तेलंगाना मध्ये काँग्रेस सत्तेत आहेत जर या काँग्रेस आमदारांची नाराजी पक्षश्रेष्ठींनी दूर केली नाही आणि काँग्रेसच्या या दहा आमदारांनी आपला पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर तेलंगाना मध्ये काँग्रेस सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उल्लेखनीय म्हणजे 119 सदस्यांच्या तेलंगाना विधानसभेत काँग्रेसचे एकूण 64 आमदार आहेत.
येथे काँग्रेस जवळ बहुमतापेक्षा फक्त 4 आमदारांची संख्या जास्त आहे.तर तेलंगाना बीआरएस चे 39 आणि भाजपाचे 8 असे मिळून 47 आमदार आहेत.याशिवाय येथे एआयएमआयएमचे 7 आमदार आहेत. जर तेलंगणामध्ये या नाराज काँग्रेस आमदारांनी पक्षात बंड पुकारला तर तेलंगाना काँग्रेस सरकार कोसळण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विरोधी भाजप पक्ष आणि इतर पक्षांच्या राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे लक्ष.
दरम्यान आपल्या पक्षातील नाराज आमदारांमुळे राज्यात सत्तापालट होण्याची चिन्हे काँग्रेसच्या लक्षात येताच येथे विरोधी भाजप पक्ष आणि इतर पक्षांच्या राजकीय घडामोडींवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे.
तेलंगाना मध्ये भाजप आणि बीआरएस मिळून सत्तेसाठी राजकीय ऑपरेशन राबवू शकतो का? या संभावनेवर राजकीय पाऊले उचलली जात आहे,यामागे नाराज आमदारांच्या घडामोडींवर या दोन्ही पक्षातील नेत्यांचेही लक्ष लागलेली आहे.दरम्यान मुख्यमंत्री रेड्डी यांनी पक्ष स्तरावर आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे.अशी माहिती सूत्रांमुळे समोर आली.