Christmas 2023: सूशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.
*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे*
वणी: येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारे संचालित सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण (Christmas 2023) अतिशय उत्साहात सारा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री. प्रदीप जी बोंगिरवर व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहन जी बोनगिवर यांनी विद्यार्थाना नाताळ सणानिमित्य शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे, विशेष अतिथीस्थानी रेव. फादर कृष्णमुर्ती कौलगे व प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल महातळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रेव. फादर कृष्णमुर्ती कौलगे यांनी प्रभू येशू चे वचने समजावून सांगत सर्वासांठी प्रभुकडे प्रार्थना केली. अध्यक्षीय संबोधनाद्वारे प्रा. प्रविणजी दुबे यांनी येशू ख्रिस्तांचे अहिंसेचे आणि क्षमाशिलतेचे हे तत्त्व उलगडुन सांगीत मानवी जीवनात त्यांचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशबू तोडसाम, प्रास्ताविक पूजा पांडे व आभार विनायक कीटे यांनी मानले.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या मुलांनी प्रार्थना सादर केले. चर्चमधील संगीत चमूने येशूवर आधारित उत्कृष्ट गीते सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियांका पांडे, दिपक ठेंगणे, पल्लवी वाढरे, सोनल दुबे,भूषण सोनुले, विजय महाजन ,सागर सोनवणे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.