चोरी गेलेला गणपतीचा मुकुट पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानाने परत.

चोरी गेलेला गणपतीचा मुकुट पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानाने परत.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

दारव्हा शहर व तालुक्यातील हजारो लोकांचे श्रध्दा स्थान असलेल्या यवतमाळ रोड वरील चिंतामणी श्रीगणेश मंदीरातील गणपतीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरटयाने दिनांक १५/११/२०२३ रोजी संध्याकाळी ०६/१५ वा सुमारास चोरून नेल्याने दारव्हा शहर व परीसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या बाबत पो.स्टे. दारव्हा येथे पोलीसयांनी अज्ञात चोरटया विरूध्द अप.क. ९४६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

मंदीरातील चोरी हा विषय अतिषय सवेदनशिल असल्याने पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड सर मा. अपर पोलीस अधिक्षक श्री पियुश जगताप यांनी हा विषय अतिषय गांभीयाने घेवुन गुन्हा उघडकिस आणण्याचे निर्देश दारव्हा पोलीसांना दिल्याने ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशन ची संपुर्ण यंत्रणा या कामी लावली होती. सर्व गुप्त खब-यांना देखील कामाला लावले होते.

सिसिटीव्ही फुटेज मध्ये आलेल्या चोरटयाचा फोटो तालुक्यातील सर्व समाज माध्यमावर प्रसारीत केला होता याचाच परीनाम गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १६ तासात आरोपी अमोल लक्ष्मण चव्हाण वय १९ वर्ष रा. चिखली ता. दारव्हा यास दारव्हा पोलीसांनी चोरीस गेलेल्या मुकुटा सह ताब्यात घेवुन हा गुन्हा यशर्वी रित्या उघडकिसय आणला.

चिंतामणी मोरया गणपतीचा हा मुकुट आज दिनांक २४/११/२०२३ रोजी पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड सर मा. अपर पोलीस अधिक्षक श्री पियुश जगताप, ठाणेदार विलास कुलकर्णी यांचे हस्ते मंदीर संस्थाचे अध्यक्ष श्री ठोकळ व विश्वस्त श्री संदीप ठोकळ यांना सन्माणानें परत करण्यात आला. गणपती मंदीरातील या चोरीचा दारव्हा पोलीसांनी अवघ्या १६ तासात उलगडा केल्याने संस्थाचे अध्येक्ष व पदाधिका-यांनी पोलीस अधिक्षक डॉ पवन बन्सोड यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =