Child Harrasment: मुलीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी.

Child Harrasment: मुलीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी.

Child Harrasment: दोन गटात तुफान हाणामारी २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल.

पुसद प्रतिनिधी: ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्योतीनगर घाटोडी येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी मुलीचा व्हिडीओ बनवुन फेसबुकवर टाकल्या प्रकरणी दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पहिल्या घटनेत लबीचंद नानसिंग पवार वय ३८ यांनी फिर्याद दिली की, आरोपी संतोष नारायण राठोड वय ३२ व इतर ८ असे संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवुन लबीचंद पवार यास तुझ्या नातेवाईकांनी आमच्या पुतणीचा व्हिडीओ बनवुन फेसबुकवर का टाकला असे म्हणुन वाद करुन शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घराच्या लोकांना दगड तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली व जखमी केले.

याप्रकरणी संतोष नारायण राठोड सह ९ जणाविरुध्द कलम ३२४, ३३६, ३२३, १४३, १४७ व १४८ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या गटाचे ज्ञानेश्वर सुभाष राठोड वय ३२ यांनी फिर्याद दिली की आरोपी मोहन गोकूळ पवार वय २४ व इतर १२ यांनी संगणमत करुन गैरकायद्याची मंडळी जमवुन ज्ञानेश्वर राठोड यांच्या घरावर दगडफेक करुन त्यास चाकूने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी वरील गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + eighteen =