Cheapest Gold : जर आता तुम्ही कमी किमतीत सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल,तर तुमच्यासाठी स्वस्त सोन्याचा पर्याय समोर आलेला आहे.या ठिकाणी तुम्ही सोने खरेदी करून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करू शकतात भारतात जरी सध्या सोन्याचे भाव प्रति 10 ग्राम 90 हजार रुपयेच्या पुढे गेले असले, तरीहि जगात काही देश असे आहेत तेथे सोना सध्या खूप स्वस्त मिळत आहे.तर चला आपण या माध्यमातून जाणून घेऊया की सध्या कोणत्या देशामध्ये सोने खरेदी करणे परवडू शकते.
भारतीय गोल्ड मार्केटमध्ये सोन्याचे दरात उसळी.
भारतात गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात भारतीय गोल्ड मार्केटमध्ये सोन्याचे दराने मोठी उसळी घेतली आहे.भारतीय सोने बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 90 हजार रुपयांची पातळी गाठलेली आहे.
सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीबाबत ऑल इंडिया सराफ असोसिएशन ने एक रिपोर्ट समोर आणली आहे.यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढत असल्याने भारतात सोन्याचे किमतीत मोठी वाढ झालेली आहे,मात्र अशा परिस्थितीत स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर विदेशातून सोने खरेदी करणे हा एक चांगला पर्याय Gold Investors आणि ग्राहकांसाठी सध्या ठरू शकतो.
Cheapest Gold : या देशात भारतापेक्षा 10 % स्वस्त सोने
भारतात सोन्याचे दर विचार घेत सध्या अनेक भारतीय नागरिक आर्थिक बचत म्हणून विदेशात सोने खरेदी करवी का अशी इच्छा बाळगून आहेत.यात सध्या सोने खरेदीसाठी दुबई {UAE} परवडणारे ठरणार आहे.दुबईच्या तुलनेत सध्या भारतात सोन्याची किमती तब्बल 10 ते 15 टक्के जास्त आहे.
तर दुबई मध्ये सोन्याचे दर कमी आहे, तेथे सोने दर कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे UAE सरकारकडून तेथे सोने खरेदी आणि आयातीवर कस्टम शुल्क VAT TAX फार कमी आहे.त्यामुळे येथे सोन्याची किंमत सध्या कमी आहे.दुबईमध्ये जर 10 ग्राम सोने खरेदी केले तर भारताचे तुलनेत तेथे 14 ते 15 हजार रुपयांची सध्या बचत होऊ शकतो.त्यामुळे अनेक गोल्ड इन्वेस्टर भारतापेक्षा दुबईमध्ये जाऊन सोने खरेदीला प्राथमिकता देत आहे.
या देशात सुद्धा स्वस्त सोने
दुबई पाठोपाठ सध्या थायलंड या देशांमध्ये सोने स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध आहे.अगदी स्वस्त दरात आकर्षक सोन्याचे दागिने बनविण्यासाठी थायलंड हा चांगला पर्याय असू शकतो.या देशात पटाया आणि बँकाक येथे सध्या सोन्याचे दर भारतापेक्षा फार कमी आहे.
येथे सोने खरेदी आणि गोल्ड इम्पोर्ट वर टॅक्स कमी प्रमाणात लागत असल्याने येथे सोन्याचे दर कमी आहे.उल्लेखनीय म्हणजे थायलंड मध्ये सोन्याचे दागिने बनविण्यासाठी मेकिंग चार्ज सुद्धा कमी लागतो.त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी भारतातील ग्राहकांसाठी थायलंड हा एक चांगला ऑप्शन आहे.
येथे सध्या सोन्याच्या किमती भारताच्या तुलनेत 5ते 10 टक्के कमी आहे.त्यामुळे प्रति एक तोळा सोने खरेदीवर भारतीयांची 8 ते 9 हजार रुपयांची बचत होऊ शकते.
मलेशियामध्ये सोन्याचे दर भारतापेक्षा कमी.
या व्यतिरिक्त सध्या मलेशिया या देशामध्ये सुद्धा सोन्याचे दर भारतापेक्षा कमी आहे.मलेशियामध्ये सोने खरेदीवर लागणारे टॅक्स आणि सोन्याच्या आयातीवर टॅक्स कमी असल्याने सध्याचे दर कमी आहे.दरम्यान मोठ्या प्रमाणात भारतीय प्रवासी मलेशियाला प्रवास करीत असताना येथे सोने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे.
कारण मलेशियामध्ये सुद्धा भारताच्या तुलनेत सोन्याचे दर 5 ते 10 टक्के स्वस्त आहे.मलेशिया मध्ये सोने दर कमी असून तेथे दागिने बनवण्यासाठी कमी पैसे लागतात.प्रति 10 ग्राम सोने खरेदीत मलेशियामध्ये भारतीय नागरिकांचे 8 ते 10 हजार रुपयांची बचत होऊ शकते.
जर तुम्ही सोन्यात पैशांची गुंतवणूक करण्याची इच्छा ठेवत असाल तर सध्या सिंगापूर मध्येही सोने खरेदी करणे म्हणजे आर्थिक फायदा करून घेणे आहे.सिंगापूर मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीवर किंवा चांगल्या दर्जाच्या सोने खरेदीवर GST आणि इतर Tax लागत नाही.
त्यामुळे भारताच्या तुलनेत सिंगापूर मध्ये सोन्याचे दर नेहमी कमी असतात.सध्या तेथे भारतापेक्षा 5 ते 10 टक्के सोने स्वस्त आहे.त्यामुळे येथे 10 ग्राम सोने खरेदीवर भारतीयांचे 6ते 7 हजार रुपयांची बचत होऊ शकते.
तर दुसरीकडे सोने खरेदीसाठी उत्तम पर्याय म्हणून आता हाँगकाँगकडेही पाहिले जात आहे.हॉंगकॉंग मध्येही सोन्याच्या खरेदीवर कोणताही कर लागत नाही.
यामुळे जगात सर्वाधिक जास्त सोने खरेदीचे स्पर्धा हॉंगकॉंग मध्ये दिसून येते.येथे सुद्धा भारताचे तुलनेत 5 ते 10 टक्के स्वस्त सोने आहे.येथे सोने खरेदी करून तब्बल 9 हजार रुपयांची बचत प्रति 10 ग्राम वर होऊ शकते.
परदेशातून सोने आयात करताना या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे.
- सध्या भारतात सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतल्याने सोने खरेदीदरांमध्ये याला खरेदी करण्याचा कल कमी झाला आहे.तर दुसरीकडे सध्या दुबई,सिंगापूर,थायलंड,मलेशिया आदी देशात भारतापेक्षा कमी दरात प्रत्येक 10 ग्राम सोने मिळत असल्याने तेथे सोने खरेदी केल्यास भारतीयांचा फायदा होऊ शकतो.
- मात्र भारतात परदेशातून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून आणल्यास कस्टम ड्युटी आणि Import Tax भरावा लागतो.
- त्यामुळे परदेशातून सोने खरेदी करून भारतात आणताना कायदेशीर काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
- भारत सरकारने विदेशातून व्यक्तिगत स्तरावर सोने खरेदी करून आणल्यास काही मर्यादा ठेवल्या आहे.
- भारतीय कस्टम कायद्यानुसार प्रवासी भारतीय पुरुषांसाठी 20 ग्राम आणि महिलांसाठी 40 ग्रॅम सोने विदेशातून खरेदी करून आणू शकतात.
- इतक्या प्रमाणात सोना आणल्यास भारतात कोणताही टॅक्स लागत नाही,मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात विदेशातून सोने खरेदी करून आणावयाचे असल्यास यासाठी भारतीय कायद्यानुसार निर्धारित टॅक्स अदा करावा लागेल. त्यामुळे विदेशातून सोने खरेदी करून भारतात आणल्यास वरील मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे.
ग्राहक आणि Gold इन्वेस्टर्सचा विदेशातून सोने खरेदी करण्याकडे कल?
सध्या भारतात सोन्याची वाढती किमती पाहता परदेशातून सोने खरेदी करणे हा भारतीयांसाठी फायदेशीर असा पर्याय मानला जात आहे.
येथे सोनेदरात वाढ झाल्याने भारतीय ग्राहक आणि Gold इन्वेस्टर्स विदेशातून सोने खरेदी करण्याकडे जास्त रुची दाखवीत आहे.मागील काही दिवसांपासून दुबई,सिंगापूर,मलेशिया,आयलँड,हॉंगकॉंग या देशातून जास्त सोने खरेदी करण्यास धनिक आणि Gold Investors प्राधान्य देत आहे,जर तुम्ही नवीन सोन्याचे दागिने किंवा गोल्ड मध्ये इन्वेस्ट करण्याची इच्छा असेल तर सध्या भारताचे तुलनेत कमी दर असलेल्या देशांचा पर्याय सोने खरेदीसाठी निवडू शकतात.