Cheapest Electric Car : देशात आता सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच दाखल होणार आहे.ही कार टाटा नॅनो सारखीच राहणार असून त्याची किंमत अगदी कमी राहणार आहे.जर तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला फक्त थोडेच दिवस थांबावे लागेल,कारण भारतात ही कंपनी आपली आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार भारतात दाखल करणार आहे.
कंपनी ही आपल्या भारतातील कार प्रोडक्शन प्लांटमध्येच या EV कारसाठी लागणारी लिथियम बॅटरी तयार करण्याची योजना आखत आहे, जर या कंपनीने आपल्या प्रोडक्शन मार्फतच कार मध्ये बॅटरी दिली तर ही EV कार आणि बॅटरी ची किंमत मिळून अगदी स्वस्त ठरणार आहे.
जर इलेक्ट्रिक का खरेदी करायचा विचार असेल,तर विन फास्ट कंपनीची ही बातमी इलेक्ट्रिक कार शौकिनांसाठी खास मानली जात आहे. अगदी काही दिवसानंतर ही इलेक्ट्रिक कार भारतीय वाहन मार्केट मध्ये दाखल होईल. याबाबत आपण इतर माहिती सुद्धा या माध्यमातून जाणून घेऊया.
आतापर्यंतच्या इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये ही सर्वात स्वस्त अशी कार ठरणार आहे,असा असा दावा या कार कंपनीने केलेला असून कारची लॉन्चिंग करण्यापूर्वी ही कंपनी याची किंमत आणखीन किती कमी होऊ शकते यावर काम करीत आहे.ही कोणती कंपनी आहे आणि कशी स्वस्त कार बनवीत आहे याबाबत जाणून घेवू या….
विन फास्ट ही कंपनी व्हिएतनाम या देशाची असून,लवकरच ती आपली इलेक्ट्रिक कार स्वस्त किमतीत भारतात लॉन्च करेल.उल्लेखनीय म्हणजे या कंपनीची ही इलेक्ट्रिक कार उत्पादन स्वदेशी पद्धतीने केले जाणार असून, या कंपनीने भारतात तामिळनाडू राज्यात आपला इलेक्ट्रिक कार उत्पादन प्लांट उभारलेला आहे.
गेल्या वर्षी 2024 पासूनच तामिळनाडू प्लांटमध्ये विनफास्ट कंपनीने आपल्या कार प्रकल्प मध्ये विविध EV आणि EV SUV Car models उत्पादनाचे काम वेगाने सुरू केलेले आहे.याचमुळे विनफास्ट कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक कार सर्वात आधी भारतात लॉन्च होणार आहे.
विनफास्ट कंपनीच्या या कारचे नाव व्हीएफ 7 एसयूव्ही (VF 7 SUV)असे असेल.ही कार कंपनी याच वर्षी पुढे येणाऱ्या एखाद्या त्योहारादरम्यान सादर करू शकते अशी शक्यता आहे.
यापूर्वी विनफास्ट कार कंपनीने इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये आपली ही इलेक्ट्रिक कार ऑटो एक्सपो 2025 मध्ये प्रदर्शित केलेली आहे. त्यादरम्यान या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारचे खूप कौतुक सुद्धा झालेले आहे.यानंतरच विनफास्ट कार कंपनीची ही EV SUV कार केव्हा भारतात launch होते याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
Cheapest Electric Car : विनफास्ट कंपनीची सर्व वाहने आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्येच लॉन्च होणार
भारतात इलेक्ट्रिक कारचे प्रोडक्शन सुरू केल्यानंतर विनफास्ट ऑटोमोबाईल कंपनीने आता भारतात पुढे लाँच होणारे कंपनीचे सर्व वाहन आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्येच सादर करण्याची योजना आखली आहे.
यादरम्यान लवकरच लॉन्च होणारी व्हीएफ सेवन एस यु व्ही (VF 7 SUV)कार ची किंमत आणखीन कमी करता यावी,यासाठी कंपनीने आपल्या तामिळनाडू येथील प्लांट मध्येच कारची बॅटरी तयार करण्याची योजना आखलेली आहे.पुढील दिवसात विनफास्ट ऑटोमोबाईल्स कंपनीकडून भारतात इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट मध्ये व्हीएफ सेवन एसयूवी (VF 7 SUV) यासह पुढे SUV,VF 6,VF3,VF8 आणि VF 9 या इलेक्ट्रिक कारचा समावेश असेल.
ही असेल सर्वात स्वस्त आणि परवडणारी विनफास्टची कार.
विन फास्ट ऑटोमोबाईल्स भारतात इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये VF 3 hi सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार अशी शक्यता आहे.ही विशेषकर सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल.
समोर आलेल्या काही मीडिया रिपोर्ट नुसार ही VF 3 इलेक्ट्रिक कार भारतात उत्पादित टाटा नॅनो सारखीच अगदी कमी किमतीची असेल,आणि यात डिजिटल आणि आकर्षक असे नवीन फीचर्स देण्यात येईल.सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार या कार ला 2 दरवाजे आणि ही कार 2 सीटर असेल.इंटेरियर डिझाईन आणि डिजिटल फीचर्स वर सध्या ही कंपनी काम करीत आहे.
VF 3 EV चे संभाव्य फीचर्स आणि रेंज.
देईल MG Comet EV Car ला टक्कर!!!?
- VF 3 या विन फास्ट कंपनीची इलेक्ट्रिक कार संदर्भात अनेक बाबी समोर आलेले आहे.सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असेल,जी टू सीटर सुविधा देणारी आहे.
- मीडिया रिपोर्ट नुसार व्हीएफ थ्री एका चार्जिंग मध्ये तब्बल 215 किलोमीटरचा रेंज येईल.
- याला 0.0ते 100 ची स्पीड घेण्यासाठी अवघे 5.5 सेकंदाचा वेळ लागेल.
- या इलेक्ट्रिक कार मध्ये ABS आणि EBD फीचर्स यासह रियर साईड पार्किंग सेंसर सुविधा असेल.
- सध्याच्या इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये या कारची तुलना जर केली तर MG कॉमेट या इलेक्ट्रिक कारला मार्केटमध्ये व्हीएफ थ्री अशी शक्यता आहे.