एस टी चालक व वाहक यांच्या कर्तव्यडक्षयतेने वाचले महिलेचे प्राण.

एस टी चालक व वाहक यांच्या कर्तव्यडक्षयतेने वाचले महिलेचे प्राण.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

महिला प्रवासीला पोहचविले आरोग्य केंद्रात.

राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस मधे प्रवासी घेऊन जात असताना अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली त्यात त्या महिलेला चक्कर आल्याने बेशुद्ध पडली एस टी बस चालक व वाहक यांनी सतर्कता बाळगत तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविल्याने एस टी चालक व वाहक यांचे कौतुक केल्या जात आहेत.

नेहमी चालणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाची एस टी क्रं.एम एच ४०,एन – ८७२८ ह्या मधे १८ प्रवसी घेऊन राजुरा ते गाडेगाव जाणाऱ्या बस मधे सौ.पार्वताबाई आनंदराव पेटकर वय ५५ रा. आवाळपुर या महिला प्रवासीची बिबी गावाजवळ बस मधे अचानक तब्बेत बिघडली तिला चक्कर आल्याने ती बेशुद्ध पडली एस टी मधे बसलेले प्रवासी एस टी चालक सुनील वाढई व वाहक हमीद कुरेशी यांनी सतर्कता बाळगत सर्व प्रवास्याना नांदा फाटा येथे उतरवून एस टी बस मधे बेशुद्ध महिलेला घेऊन नांदा येथील प्राथमिक उपचार केंद्राकडे बस वळवली आणि तिला उपचारासाठी भरती करण्यात आले.

वैद्यकीय उपचार नंतर आता महिलेची प्रकृती ठीक असून उच्च रक्तदाब वाढल्याने तिला अचानक चक्कर आल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे ज्या राज्य परिवहन मंडळचा बसने सदर महिलेला आरोग्य केंद्रात आणले गेले तिची पाहणी केली असता बसेस ची हालत खस्ता झालेली दिसून आली अशा बसेस परिवहन मंडळ जर वापरत असेल तर प्रवसाची गत काय होणार, खास करून महिलांना ५०% सुट देण्यात आली तेव्हा पासून महीला मोठ्या प्रमाणावर प्रवास करताना दिसून येत असल्या तरी या बसेस ची खस्ता हालत बघता परिवहन मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 7 =