*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*
परराज्यातून आलेल्या कामगारांच्या बालकांचे केले पोलिओ लसीकरण.
देशात सर्वत्र पोलिओ लसीकरण सुरु असून देशातील कानकोपऱ्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोज देण्यात येत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील चारही आरोग्य केंद्राने परराज्यातून आलेल्या तथा बाहेर गावातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या मुलांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जात पोलिओ डोज दिले.
अशा प्रकारचे तळागळात जात राबविण्यात येत असलेल्या पोलिओ लसीकरनाच्या कामावर आनंद व्यक्त करीत आरोग्य संचालक मुंबई चे नितीन अंबाडेकर यांनी कोरपना तालुका वैद्यकीय अधिकारी स्वनिल टेंभे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
परराज्यातून मिरची तोडीकरिता व झाडूविक्री करिता आलेल्या बालकांचे लसीकरण.
तेलंगानातील आदीलाबाद व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोरपणा तालुक्यात परराज्यातून मिरची तोड साठी आलेल्या मिरची तोड कामगारांच्या मुलांना आज प्रा.आरोग्य केंद्र नांदा अंतर्गत असलेल्या खिर्डी उपकेंद्रामार्फत लालगुडा येथे जिवती तालुक्यातील मारोटिगुडा येथील एक,वाशीम जिल्हातील कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील तीन बालकांना व छत्तीसगड राज्यातील बिलासपुर जिल्ह्यातील रतनपुर तालुक्यातील चोहरादेवी गावातील शिकारी नावाच्या कुटुंबातील पाच बालकांना मोबाईल टीमच्या माध्यमातून पोलिओ डोस पाजण्यात आले.
मोबाईल टीमच्या माध्यमातून जिनींग मध्ये जात जिनींग कामगारांच्या मुलांना ही पोलिओ डोज.
कापूस उत्पादक कोरपना तालुक्यामधील जिनिंग हब असलेल्या वनसडी व गडचांदूर मार्गावर मध्य प्रदेशातील दिंडोरी व उमरिया जिल्ह्यातून कॉटन जिनिंग मध्ये कामासाठी आलेल्या कामगारांच्या मुलांचे त्याच्या राहत्या ठिकाणी जात मोबाईल टीमच्या माध्यमातून पोलिओ डोज पाजण्यात आले.
यावेळी कोरपना व जिवतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय पर्यवेक्षक डॉ. दीप्ती मोहितकर, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडावाचे डॉ. तरोने, नांदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संकेत शेंडे, डॉ.अनघा पाटील, नारंडाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा ताकसांडे,कवठाळा आरोग्य केंद्राचे डॉ. बावणे व चारही आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांनी सहकार्य केले.