अवध रित्या उत्खनन करताना पोकलेन सह हायवा जप्त.

अवध रित्या उत्खनन करताना पोकलेन सह हायवा जप्त.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

कोरपना तहसीलदाराची धडक कारवाई ; पारडी पैनगंगा नदी घाटातील प्रकार

कोरपना तालुक्यातील पारडी येथील पैनगंगा नदी घाटावर कोरपना चे तहसीलदार पी एस व्हटकर यांचे नेतृत्वात महसूल पथकाने धाड टाकून अवध रित्या रेती उत्खनन करताना एक हायवा व पोकलेन जप्त केले. ही कारवाई बुधवार दिनांक ६ ला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सदर हायवा व पोकलेन बालाजी बिल्डर्स कंपनीचे आहे.

महसूल विभागाचे कर्मचारी कार्यालयात असल्याचा फायदा घेत भर दिवसा नदीपात्रातून रेती उत्खनन करत असताना. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई तहसीलदार पी एस व्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी बुराडे, तलाठी व्ही एम मडावी , पी एम कमलवार , ए एस गोसाई , वाहनचालक नागोसे , कर्मचारी सलीम शेख आदींनी पूर्ण केली. महसूल विभागाकडून धडक कारवाया केल्या जात असताना भर दिवसा मुजोरी करणाऱ्या अवध रेती तस्कराना यामुळे चांगला बसला आहे. दोन्ही वाहन तहसील कार्यालय कोरपना येथे जप्त करून ठेवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − five =