तांडा येथील ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट.

तांडा येथील ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट.

एक आरोपी अटकेत : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क वरोरा विभागाच्या वतीने तालुक्यातील तांडा येथे टाकलेल्या धाडीत ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. यात एक आरोपी अटकेत आहे. निवडणुकीच्या काळात कुठेही असामाजिक तत्त्वाने शांतता भंग करू नये या हेतूने अवैध दारू व्यवसायिकावर राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा यांनी माहितीच्या आधारावर तालुक्यातील तांडा गावाजवळील जंगलातील नाल्याजवळ गावठी दारू तयार करीत असलेल्या ठिकाणावर धाड टाकली.

त्यात ४०० लिटर सडवा, ५० लिटर तयार दारू मिळाली. ती त्याच ठिकाणी नष्ट करण्यात आली. तर दुसरीकडे दुचाकीने ३० लिटर गावठी दारू विक्रीसाठी नेत असताना राजेश मानोत यास मुद्देमालासह पकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई १९ मार्चला करण्यात आली. वरील दोन्ही प्रकरणात मुद्देमालाची किंमत ७० हजार रुपये होती.

राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा निरीक्षक विकास थोरात, उपनिरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद राजोते, जवान जगदीश मते, जितेंद्र आनंद, अमोल भोयर, चालक विलास महाकुलकर यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास निरीक्षक विकास थोरात करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × four =