Chagan Bhujbal कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा या वादग्रस्त विधानाने OBC समाज आक्रमक.
भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा…शिवसेनेचे M.L.A Sanjay Gaikwad
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे. तर, आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अध्यादेश वरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करून एका नवीन वादाला सुरुवात केली आहे.
एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही, असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड
असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय.
आता संजय गायकवाड यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. आज ओबीसी समाजाच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकत्र येत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.