CBSE Pattern in Maharashtra : महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र आता हा निर्णय नव्या चिंता आणि संभ्रमांमुळेवादात सापडताना दिसत आहे.सरकारने नव्या शैक्षणिक सत्रात नवा शिक्षण पॅटर्न अमलात आणण्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार राज्यात शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा 30 टक्के आणि सीबीएससी चा अभ्यासक्रम 70 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर आता विरोधी पक्ष सरकारला सवाल करीत आहे.
सोबतच सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न अशा प्रकारे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या पॅटर्ननुसार अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.
सरकार आणि शिक्षण मंत्रालयाच्या तयारीवर विरोधकांचे प्रश्न
महाराष्ट्रात 20226-27 या शैक्षणिक वर्षात राज्यभरात सर्व शाळांमध्ये सीबीएससी {CBSE}पॅटर्न लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे.दोन महिन्यापूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही घोषणा केलेली आहे,घोषणा करताना त्यांनी CBSE पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित केला जाणर असल्याची माहिती सुद्धा त्यावेळी दादा भुसे यांनी दिलेली होती.
या दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न टक्केवारीप्रमाणे लागू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलेले होते की.सीबीएससीची घोषणा करण्यापूर्वीच सरकारकडून शाळांमध्ये यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करणे गरजेचे आहे.यावर सरकार आणि शिक्षण मंत्रालय काय करणार असा सवाल त्यांनी केला होता.
मराठी मातीतील इतिहास पुसला जात असेल तर पॅटर्नची महाराष्ट्राला गरज काय?-जितेंद्र आव्हाड.
यानंतर आता विरोधी पक्षात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत.महाराष्ट्रात बीएससी पॅटर्नमुळे महाराष्ट्र आणि पर्यायाने मराठी मातीतील इतिहास पुसला जात असेल तर या पॅटर्नची महाराष्ट्राला गरज काय आहे?असा सवाल उपस्थित केलेला आहे.
राज्यात सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू होताना राज्य शिक्षण मंडळाकडून तयार होत असलेल्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले विषय फक्त 30 टक्केच राहणार,यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला कितपत न्याय मिळणार?
असा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केलेला आहे.मात्र यावर सत्ताधारी पक्षाचे शिक्षक आमदार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलेले आहे की,राज्यात CBSE पॅटर्नमुळे मराठी आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
CBSE Pattern in Maharashtra : शिक्षक आणि पालकात काय आहे संभ्रम?
राज्यात सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न शालेय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा आणि अंमलबजावणी संदर्भात काय कारवाई करण्यात येईल,याबाबत माहिती दिल्यानंतर सुद्धा या मुद्द्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक संभ्रमात दिसत आहे.
शिक्षक आणि पालकांच्या मते सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्नचा प्रवेश आणि अचानक अभ्यासक्रमात झालेला हा बदल विद्यार्थ्यांना झेपणार का?आणि याबाबत शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत सरकार काय कारवाई करत आहे? यसह इतर अनेक विविध प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
काय आहे महाराष्ट्रात सीबीएससी पॅटर्नचा फॉर्मुला?
येणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्रात सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये CBSE पॅटर्न टप्याटप्याने लागू होणार आहेत.यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आता 70% आणि 30 टक्के असा फार्मूला राबविला जाणार आहे.
- यामध्ये 70 टक्के अभ्यासक्रम CBSE नुसार
- 30 टक्के पॅटर्न राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रमनुसार असेल.
- या पॅटर्नमध्ये महाराष्ट्रात भाषा आणि इतिहास या विषयांवर कोणती तडजोड केली जाणार नाही अशी माहिती विधान परिषदेत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलेली आहे.
- मराठी भाषा आणि इतिहास हा विषय राज्य शिक्षक मंडळाचे अभ्यासक्रमानुसार राहणार असल्याचे नव्या शैक्षणीक सत्रात स्पष्ट होणार आहे.
- CBSE Pattern 70% लागू होत असताना अभ्यासक्रमात राज्य शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेल्या 30% अभ्यासक्रम अधिकारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,मराठा साम्राज्याचा इतिहास आणि ताराराणी यांच्या संदर्भात अभ्य्साक्रम सामील राहणार अशी माहिती सरकारच्या वतीने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे.
- महत्वाचे म्हणजे राज्यात सीबीएससी पॅटर्न नवीन शैक्षणिक सत्रात लागू करताना सर्वात आधी इयत्ता पहिलीला CBSE Pattern नुसार अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
- यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी पुढील सत्रात या Pattern नुसार पुढील इयत्तेमध्ये अभ्यासक्रम बदलत जाईल.
- या नव्या अभ्यासक्रमानुसार सर्व पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची राहणार आहे.
- शैक्षणिक सत्र 2026-27 सुरू होताच इयत्ता 1 ली ला CBSE पॅटर्न लागू होत असल्याने 1 जूनला सर्व शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना या संदर्भात प्रशिक्षण दिले जाईल,असे शिक्षण मंत्रालय आणि राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या पॅटर्नमुळे शाळांचे वेळापत्रक बदलणार का?
राज्यात येत्या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पहिली पासून CBSE पॅटर्न वरील फॉर्मुल्यानुसार लागू होत असल्याने शाळांचे एका वर्षासाठी असलेले वेळापत्रक कोलमडणार,अशी शक्यता वर्तवली जात आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक इयत्ता पहिली पासून नवव्या इयत्तेपर्यंत वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याच्या सूचना जारी करण्यात आले आहे. यामुळे नव्या शैक्षणिक सत्रासाठी आत्तापासूनच नवे गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे.
- एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या परीक्षेऐवजी पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच परीक्षा व्हाव्या अशी मागणी शिक्षक आणि पालक करीत आहे.
- या नव्या सूचनेनुसार आता परीक्षा संपवून येणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रातील दहावीचा अभ्यासक्रम नेमका केव्हापासून सुरू करायचा?असा प्रश्न मुख्याध्यापक आणि आणि शिक्षकांनसमोर आहे.
- याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात बहुतांश शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 10 वी अभ्यासक्रमाचे शिक्षण वर्ग घेण्याची सुरुवात ही एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येते.
- नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात येतात.
- यामुळे विद्यार्थ्यांना असा फायदा मिळतो की,दहावीचे नियमित नव्या सत्रात वर्ग सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना दहावी अभ्यासक्रमाचा मोठा भाग पूर्ण होत असतो.
शिक्षण मंत्रालय,शिक्षण विभाग आणि शिक्षण परिषद यांच्या नव्या सूचनेनुसार इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा पुढील सत्र 2026-27 मध्ये 22 एप्रिल पर्यंत सुरू राहणार.
यामुळे नव्याने दहावीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागीआधीच वर्गांचे नियोजन होणार नाही,अशी खंत शिक्षक आणि पालक यांच्यासह 10 मध्ये जाणारे विद्यार्थीसुद्धा व्यक्त करीत आहे.