वसमत बस स्टॅंड कार्नर वरिल अतिक्रमन काढण्याची व या भागात दिवसभर आवैद दारू गुटखा सावकारी जोराने चालू आहे हेही बंद करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे.
हिगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर
वसमत बस स्टॅंड कार्नर पाटील नगर , सिद्धेश्वर शाळे कड जाणाऱ्या रोड वरील अतिक्रमन काढण्या बाबतचे निवेदन येथील सुज्ञ प्रतिष्ठीत नागरीकांनी प्रशासनास दिले आहे .
नागरीकांच्या निवेदनाची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊण योग्य ती कार्यवाही करण्याचा लोकहितास्तव निर्णय घ्यावा अशी त्यांच्या वतिने विनंती करण्यात येत आहे.
शहरात सर्व मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे करुण काही जन त्या अतिक्रमीत जागा किरायाने देऊण अर्थिक लाभ घेत असल्याची चर्चा आहे .
तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री उमाकांत पारधी यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात शहरातील सर्व आ०हाणात्मक अतिक्रमन काढून चांगले रेकार्ड केले होते . अतिक्रमन काढून सर्व रिकाम्या जागेत वृक्षारोपन करुण त्यांना सेफ्टी गार्ड बसवुन झाडे जगवण्याचे जनतेला आ०हाण केले होते ते असे पर्यत्न टैंकरने झाडांना पाणी देण्यात येत होते . शहरातील सर्व जनतेने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
परंतू त्यांनी प्रशासकीय नियमांची कठोर अमलबजावणी करत उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल त्यांची त्वरीत बदली करण्यात आली तेव्हा केलेले वृक्षारोपन आता पर्यंत जपले असते तर त्यांच्या सावलीचा लाभ वसमतवाशीयांना झाला असता.अधिकारी बदलले की कार्यप्रणाली बदलली त्या प्रमाणे आता सर्वत्र शहरातील सरकारी रिकाम्या जागेत व काही स्वमालकीच्या जागेत ही जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची पर्वा न करता अतिक्रमण करूण मोठया प्रमाणात अवैध धंदे ,सावकारी दारु गुटखा तेजीत सुरू आहेत .
ते सर्व धंदे व अतिक्रमणे हाटवावे अशी जनतेत चर्चा आहे .लोकप्रतिनीधी च्या दबावात लोकसेवक कार्य करत असल्याने नियम फक्त कागदावर राहत आहेत त्यांची कडक अमलबजावणी झाली तर न.प.ने बांधलेले गाळे रिकामे राहणार नाहीत व न.प. ला चांगला महसुल मिळेल त्या करिता सर्व अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासन करेल का? असा जनतेला प्रश्न पडला आहे.
अतिक्रमण पण टपऱ्या उचलणे व जातीय ते निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावे याकरिता या भागात राहणाऱ्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्य अधिकारी नगर परिषद व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर माजी नगरसेवक धनंजय गोरे माजी नगरसेवक राजकुमार इंगळे माजी नगरसेवक डॉक्टर गोकुळ अग्रवाल चंद्रशेखर सोळंके डॉक्टर उमाकांत मराडे डॉक्टर दीपक कराडे शेखर जयस्वाल देशमुख शुभम वैभवश अमोल ओम राठोड आधीचे स्वाक्षऱ्या आहेत.