Budget 2025 : जाणून घ्या 12 लाख उत्पन्न टॅक्स फ्री करण्यामागे केंद्रीय अर्थमंत्री चा गेम प्लान !

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी रोजी केंद्राचा वार्षिक आर्थिक बजेट सादर केला यात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना विविध माध्यमातून दिलासा देण्यात येत असल्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे इन्कम टॅक्स संबंधात त्यांनी महत्त्वाची घोषणा करताना उत्पन्न टॅक्स मुक्त करण्यामागे नवा गेम प्लान काय आहे याची संकेत दिले आहे.

देशात जुन्या टॅक्स सिस्टीमने कर भरणाऱ्या आयकरदात्यांना केंद्राच्या या बजेटमध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाही.किती उत्पन्न करमुक्त होणार याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांनी केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यात 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर अशा उत्पन्न धारकांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे.त्यांना नवीन टॅक्स रिजीम मध्ये यावे लागनार, तरच त्यांचा 12 लाख वार्षिक उत्पन्न करमुक्त होईल. जाणून घ्या यामागे अर्थमंत्र्यांचा काय आहे गेम प्लान….

एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीता प्रमाणे यांनी 2025 26 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.यात 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न घेणाऱ्या टॅक्स पेयर्सना टॅक्स माफ करण्याची घोषणा करीत अर्थमंत्री सीतारामन यांनी देशभरातील कोट्यावधी करदात्यांसाठी अनपेक्षित अशी घोषणा केली.

मात्र 12 लाख उत्पन्नावर टॅक्स माफी ही फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्या टॅक्स पेयर्सना लागू होईल.New Tax Regime System.त्यामुळे देशात जुन्या टॅक्स सिस्टम नुसार टॅक्स भरणाऱ्या करदात्यांना या अर्थसंकल्पात घोषित नवीन असा 12 लाख उत्पन्न मर्यादेत टॅक्स माफीची सूट मिळणार नाही.

काय आहे New Tax System?

उल्लेखनीय म्हणजे देशात ओल्ड टॅक्स सिस्टम Old Tax Slabs नुसार आपल्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स पे करणाऱ्या करता त्यांची खूप मोठी संख्या आहे. केंद्र शासनाने नुकतेच देशात नवीन इन्कम टॅक्स प्रणाली बनविली आहे. याला न्यू टॅक्स रिजिम सिस्टम म्हटले जाते.New Tax Slabs मात्र देशभरात आयकरदात्यांनी या नवीन टॅक्स सिस्टीम कडे पाठ फिरविली आहे.

त्यामुळे अर्थ मंत्रालय कडून नवीन टॅक्सची घोषणा झाल्यावरही केंद्र सरकारला निर्धारित इन्कम टॅक्स महसूल मिळत नाही. त्यामुळे या वार्षिक अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जुन्या टॅक्स सिस्टीमने आपला इन्कम टॅक्स भरणाऱ्या आयकर दात्यांना नवीन टॅक्स रिजीमकडे वळविण्यासाठी 12 लाख रुपये उत्पन्नावर टॅक्स माफीची घोषणा करावी लागली आहे.

जर यानंतरही जुन्या सिस्टम ने आयकरदाते आपला टॅक्स भरत असेल, तर यामुळे सरकारला जास्त महसूल मिळणार नाही, हे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री यांना यंदा आयकरदात्यांना ही आकर्षित करणारी घोषणा करावी लागली आहे, असे देशातील आर्थिक क्षेत्रातील विशेषज्ञ मानत आहे.

देशात नवीन कर प्रणालीकडे बहुतांश इन्कम टॅक्सपेयर्सनी पाठ फिरविली आहे. यापूर्वी देशात म्युच्युअल फंड,विविध प्रकारचे इन्शुरन्स, होम लोन या आर्थिक बाबींवर लाभ मिळत असल्यानेच लोक नवीन सिस्टमने आपला कर भरत आहे.याकरता त्यांना ओल्ड टॅक्स रिजिम वरून नवीन कडे वळविण्यासाठीच अर्थमंत्री सीतारमण यांना हा नवा गेम लागला आहे.

Budget 2025 : 12 लाख रुपये उत्पन्नावर आयकर माफी कुणाला मिळणार?

एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेनुसार 12 लाख रुपये उत्पन्नावर आयकर माफी देण्यात येणार आहे.यादरम्यान देशभरात आयकर देताना आता ओल्ड टॅक्स रिजीम वरून न्यू टॅक्स रिजन कडे वळविण्यासाठी नियम बनवून त्यांना भाग पाडले जाणार आहे. कारण केंद्रीय अर्थसंकल्प 2025 26 मध्ये अर्थमंत्र्यांनी ओल्ड टॅक्स रिजिम प्रणालीत येणाऱ्या आयकरदात्यांना कोणतीही सूट दिली नाही. सोबतच यासाठी टॅक्स स्लॅब मध्ये सुद्धा यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

2 लाख 50 हजार उत्पन्नावर आता 0 Income Tax.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्षिक उत्पन्नावर आयकर मर्यादा निश्चित केली आहे.

  • 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आता इन्कम टॅक्स लागणार नाही. एवढी वार्षिक इन्कम घेणाऱ्यांना आता इन्कम टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे.
  • मात्र अडीच लाखापेक्षा एक रुपया जास्त इन्कम घेतली तर 5% इन्कम टॅक्स.
  • 5 लाख ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20 टक्के.
  • 10 लाख पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आता 30 टक्के इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.

देशात न्यू टॅक्स रिजिम चा लाभ घेण्यासाठी आता सर्व प्रकारच्या करदात्याना यामध्ये सामील व्हावे लागणार आहे.अन्यथा आपल्या उत्पन्नावर केंद्र सरकारकडून उत्पन्नकर माफीचा लाभ मिळू शकणार नाही,अशी शक्यता आर्थिक क्षेत्रात वर्तवली जात आहे.

असा आहे नवा इन्कम टॅक्स स्लॅब.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प 2025 26 मध्ये 2 लाख 50 हजार वार्षिक उत्पन्न मर्यादेवर आता इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही,अशी घोषणा केलेली आहे.सोबतच हा अर्थसंकल्प सादर करताना देशासाठी नव्या टॅक्स स्लॅब नुसार आता उत्पन्नात वाढ होत असताना किती टॅक्स द्यावे लागणार याचा तक्ताही सादर केला आहे.

देशात इन्कम टॅक्स हा सरकारसाठी महसूल देणारी थेट अशी करप्रणाली आहे.सरकार नेहमी प्रगतीशील असा टॅक्स स्लॅब दर लागू करते. हा नवीन स्लॅब आधपासून लागू करण्यात आला आहे.यातून टेक्सपेयर्सचे उत्पन्न वाढीसोबतच टॅक्स दर निश्चित करण्यात आले आहे.

देशात प्राप्तिकर कायदा, 1961 हा दोन कर व्यवस्थांसाठी तरतूद करतो,यात जुनी कर व्यवस्था, जी विविध कपाती आणि सवलतींना परवानगी देते,आणि नवीन कर व्यवस्था, जी सूट न देता कमी कर दर आकारते, अशा नवीन टॅक्स लॅबला सरकारने लागू केलेली आहे.

यानुसार यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरदात्याना त्यांचे उत्पन्न वाढ होत असताना त्यानुसार टॅक्स अदा करावा लागणार आहे.अर्थमंत्र्यांनी नव्या स्लॅब नुसार खालील टॅक्स दर लागू झाल्याची घोषणा केली.

यानुसार आता 0 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न वाढीवर कोणताही टॅक्स लागणार नाही.

4 लाख ते 8 लाखापर्यंत 5 % टॅक्स

8 लाख ते 12 लाख पर्यंत दहा % टॅक्स

12 ते 16 लाखापर्यंत 15%

16 ते 20 लाखापर्यंत 20 %

20 ते 24 लाखापर्यंत 25 %

आणि 24 लाखांच्यावर 30% टॅक्स अदा करावा लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

13 − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.