BSNL आला वेगात,सर्वात स्वस्त प्लॅन सुरु, आता फ्री कॉलिंग करा आणि मिळवा 1.5 जीबी डेटा.

BSNL आला वेगात,सर्वात स्वस्त प्लॅन सुरु, आता फ्री कॉलिंग करा आणि मिळवा 1.5 जीबी डेटा

देशात एरवी अनेक संकटाचा आणि खाजगीकरणाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल ला फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.टेलिकॉम कंपन्यांचे स्पर्धेत ही शासकीय दूरसंचार यंत्रणा टिकून राहावी, यासाठी बीएसएनएल ने कंबर कसली आहे.बाजारात सर्वात स्वस्त प्लान आणून याचा नेटवर्क स्पीड वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. बीएसएनएलने टेलिकॉम कंपन्यांमध्ये अग्रेसर असलेल्या जिओ ला टक्कर देण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

याबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतेच माध्यमांना याची माहिती देताना सांगितले होते,देशात लवकरच 4 जी सेवा बीएसएनएल सुरू करणार आहे.पुढच्या वर्षी बीएसएनएल कडून 4 जी कनेक्टिव्हिटी देशात उपलब्ध होईल आणि हा नेटवर्क वेगाने काम करेल अशी आशा केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी वर्तवली आहे.

स्मार्टफोन युजर मोठ्या प्रमाणात BSNL कडे वळले.

विशेष म्हणजे मागील काही महिन्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांनी स्पर्धा वाढवून रिचार्ज दर वाढविले.याच कारणाने आता सरकारी दूरसंचार कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेड ला सुगीचे दिवस येताना दिसत आहे. खाजगी टेलिफोन कंपन्यांची कॉलिंग आणि डाटा सेवा महागल्याने सर्वसामान्य ग्राहक पुन्हा स्वस्त असलेल्या बीएसएनएल कडे वळताना दिसत आहे.हे मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात खाजगी टेलिकॉम कंपन्यांची सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्यात येत असल्याने दिसत आहे. येणाऱ्या दिवसात देशातील कोट्यावधी युजर्स आपले सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करू शकतात अशी आशा बीएसएनएल कडून वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे स्वस्त डाटा प्लान आणि 4जी सारखी स्पीड नेटवर्क सेवा मिळणार असल्याने मोबाईल यूजर या सेवेची वाट पाहत आहेत.मागील काही महिन्यात बीएसएनएल देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत स्पर्धेत टक्कर देतानाही दिसत आहे.कारण खाजगी कंपन्यांनी कॉलिंग आणि डाटा प्लान चे रेट वाढवल्यामुळे युजर्स बीएसएनएलचे स्वस्त प्रीपेड प्लॅन कडे आकर्षित होत आहे. हे पाहता आता बीएसएनएल या सरकारी दूरसंचार निगमने लवकरच 4g आणि 5g सेवा सुरू व्हावी याकरिता तयारी दाखविली आहे.

82 दिवसांचा 485 रुपयांचा खूप स्वस्त बाजारात.

भारत दूरसंचार निगम कार्पोरेशन कडून देशात आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लान बाजारात उपलब्ध आहे. 82 दिवसांसाठी 485 रुपये देत ग्राहकांना यातून दररोज 1.5 जीबी डाटा आणि यांची दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग दररोज 100 एसएमएस मिळत आहे.या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड सेवा, राष्ट्रीय स्तरावर मोफत रोमिंग तसेच अमर्यादित कॉलिंग आणि डाटा लाभ सेवा मिळत आहे

BSNL सिम ऍक्टिव्हेट करण्यासाठी BSNL चे मिशन.

सर्वसामान्य मोबाईल युजर बीएसएनएलचा सिम घेताना किंवा इतर खाजगी कंपन्यांकडून बीएसएनएल मध्ये पोर्ट करताना अडचण येऊ नये म्हणून बीएसएनएलने सार्वजनिक स्तरावर प्रचार सुरू केला आहे.यातून बीएसएनएलचे फोरजी सिम ऍक्टिव्हेट करण्यासाठी नागरिकांना काय करावे लागणार, स्मार्टफोन मध्ये बीएसएनएल सिम कसे इंस्टॉल कराल,नेटवर्क कसा मिळेल आणि अत्यावश्यक माहितीसाठी 1507 ही नंबर डायल सेवा ही देण्यात येत आहे.

पुढच्या वर्षी BSNL ची 4G नेटवर्क सेवा, 22,500 टॉवर उभारले.

नुकतेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बीएसएनएलच्या सेवा संदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितले की लवकरच देशात बीएसएनएलची फोरजी सेवा सुरू होणार आहे. यातून फोर जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. बीएसएनएल ग्राहकांना हा नेटवर्क मिळावा यासाठी निगम कडून वेगाने काम केले जात आहे. फोरजी नेटवर्क साठी देशात बीएसएनएल कडून तब्बल 22500 मोबाईल नेटवर्क टॉवर उभारण्यात आली आहे, हा आकडा लवकरच एका लाखावर पोहोचेल,सोबतच देशाचा 10 टक्के वाटा 6 जी पेटंट मध्ये असेल. बीएसएनएलचे टार्गेट फक्त टेक्नॉलॉजी आयात करणे नसून ही सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क येथे सक्रिय राहावा यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nine + 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.