BSNL Intra Net Fiber TV | BITV : BSNL च्या या प्लानमुळे पाहू शकणार 300 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल मोफत.

BSNL Intra Net Fiber TV | BITV : भारतात सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत निगम संचार लिमिटेड (BSNL) कडून देशभरात खाजगी टेलिफोन कंपन्यांना स्वस्त रिचार्ज प्लान आणि आधुनिक टेलिकॉम सुविधा देऊन करडी टक्कर देण्यात येत आहे. बीएसएनएल सरकारी टेलिकॉम कंपनी असल्याने ती टेलिकॉम कंपन्यांचे स्पर्धेत टिकून राहावे यासाठी आपल्या लाखो युजर्सना स्वस्त असे रिचार्ज प्लान देत आहे.

तर दुसरीकडे खाजगी टेलिकॉम कंपन्यांकडून महागडे रिचार्ज विकल्या जाते.त्यामुळे आता बीएसएनएलच्या या नवीन योजनेला टक्कर देताना खाजगी टेलिफोन कंपन्यांना असे स्वस्त आणि निःशुल्क प्लान आपल्या युजर्सना देणे परवडणारे नाही,त्यामुळे आता बीएसएनएल सोबत या योजनेत स्पर्धा करताना खाजगी कंपन्यांची दमछाक होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

नुकतेच बीएसएनएल ने देशभरात आपली एक नवीन योजना लॉन्च केली आहे ज्यामुळे खाजगी टेलिफोन कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल आयडियाची चिंता खूप वाढली आहे.कारण यामुळे बीएसएनएल आर्थिक भरभराट साधणार आहे. तर दुसरीकडे बीएसएनएलच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना न्यूज चॅनल,ओटीपी प्लॅटफॉर्म, आणि विविध मनोरंजन चॅनल असे मिळून तब्बल 300 चॅनल मोफत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

BSNL ने लॉन्च केला नवीन लोगो.

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने यावर्षी आपला नवीन लोगो लाँच केला आहे. शिवाय या सरकारी टेलिकॉम कंपनीकडून अनेक नवीन स्वस्त टेरिफ आणि रिचार्ज प्लान सेवाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे BSNL आता भारतातील खाजगी असल्या दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) यांना टक्कर देणार आहे.

काय आहे ती BSNL ची योजना.

नुकतीच BSNL ने एक नवीन योजना लाँच केलेली आहे.नेमके हेच कारण आहे, ज्यामुळे Jio आणि Airtel या टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढलेली आहे.. BSNL ने इंट्रानेट फायबर टीव्ही (Intra Net Fiber TV) ही सेवा सुरू केली आहे, यात Bsnl युजर्सना 300 हून अधिक टीव्ही चॅनेल मोफत दाखवले जात आहेत. यानंतर आता ही सरकारी टेलिकॉम कंपनी BITV देखील लॉन्च करण्याच्या तयारी करत आहे.

BSNL Intra Net Fiber TV आणि BITV या दोन्ही सेवा BSNL ग्राहकांना मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहण्याची परवानगी देतात.विशेष म्हणजे BSNL कडून इंट्रानेट फायबर टीव्ही मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुरूही झाली आहे.यानंतर ही सेवा पंजाब, हरियाणा आणि पुद्दुचेरीपर्यंत विस्तारलेली आहे.

उल्लेखनीय आहे की, BSNL ची ही इंट्रानेट फायबर टीव्ही ही फायबर ब्रॉडबँड आधारित इंटरनेट सेवा आहे, तर दुसरी BITV ही नॉन-फायबर आधारित इंटरनेट सेवा आहे.याचा लाखो बीएसएनएल युजर्स घेत आहेत.

500 पेक्षा जास्त निःशुल्क टीव्ही चॅनेल.

बीएसएनएल लॉन्च केलेल्या या योजनेत सध्या वायफाय ब्रॉडबँडद्वारे इंट्रानेट फायबर टीव्ही सेवा प्रदान करण्यात येत आहे. यामध्ये युजर्सना 500 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल अगदी निःशुल्क उपलब्ध केलेल्या आहेत. BSNL च्या फायबर-टू-द-होम (FTTH) ग्राहकांसाठी ही सेवा सध्या पूर्णतः मोफत पुरविण्यात येत आहे.

त्यामुळे ग्राहकांना यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. टेलिकॉम क्षेत्रातील विशेषज्ञांच्या मते BSNL ची ही सेवा खासगी कंपन्यांसाठी मोठे असे आव्हान दिसत आहे.कारण सध्या खाजगी टेलिकॉम रिलायन्स JioFiber आणि JioAirFiber कडून ब्रॉडबँड सेवा आणि Airtel ही Airtel Xstream Fiber अशी ब्रॉडबँड सेवा शुल्क आकारून देत आहे.

BSNL BITV : 300 हून अधिक विनामूल्य टीव्ही चॅनेल.

BSNL कडून लॉन्च करण्यात आलेली BITV BSNL सर्विस ही आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी आहे. यात 300 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे.विशेष म्हणजे यात प्रीमियम चॅनेलचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.याला सध्या पाँडिचेरी मध्ये लॉन्च केले गेले आहे,येथे BSNL युजर्सना ही सेवा विनामूल्य मिळत आहे. एकूणच, लाइव्ह टीव्ही चॅनेल दाखवण्याची टेक्नॉलॉजी फक्त एकच आहे, मात्र BSNL ची आपल्या ग्राहकांना ही सेवा देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.

यामुळे BSNL ग्राहक वाढले.

देशात BSNL ह्या IFTV आणि BiTV महत्त्वाच्या आणि समान सेवा देणार आहेत. पण या सरकारी telecom कंपनीने त्यांना वेगवेगळ्या ब्रँडसह बाजारात सादर केले आहे. यात एक विशेषतः फायबर सेवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी तर दुसरी मोबाइल ग्राहकांसाठी आहे.

या सेवेमुळे आता देशातील दूरसंचार क्षेत्रात बस्नलची ग्राहकांची संख्या सतत वाढत आहे.23 डिसेंबर रोजी TRAI (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 पर्यंत अश्या सेवेमुळे 5 लाख नवीन ग्राहक BSNL सोबत जुळलेले आहेत

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

18 − seven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.