BSNL 100 Rs Recharge Plan : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल ने आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे ग्राहकांना खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जास्त आकर्षित करने सुरू केले आहे. विविध स्वस्त रिचार्ज प्लानचे ऑफर देत असताना,आता BSNL ने अगदी 100 रुपयांपेक्षाही कमी किमतीचा नवा प्लान नुकताच लॉन्च केला आहे, जो Bsnl SIM User साठी अमर्यादित कॉलिंग ऑफर करीत आहे.
चला जाणून घेऊया काय आहे हे सर्वात स्वस्त ऑफर….
भारतात खाजगी टेलिफोन कंपनी यांनी मोबाईल रिचार्ज वाढविल्याने युजरवर आर्थिक भार पडत आहे. स्मार्टफोन आणि इतर मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आपल्या कामांसाठी रिचार्ज करणे गरजेचे असते मात्र महागडे रिचार्ज प्लॅन्समुळे सर्वसामान्य मोबाईल धारक आश्चर्यचकित आहे.
यात आता बीएसएनएल विविध आकर्षक आणि स्वस्त रिचार्ज प्लान सादर करणे सुरू केल्याने इतर टेलिकॉम कंपनीचे सिम कार्डधारक आपले Sim Card मोठ्या प्रमाणात BSNL कडे Port करत आहे.
गेल्या वर्षी पासून जसेच खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले होते, तेव्हा पासून मोठ्या संख्येने ग्राहक बीएसएनएलच्या स्वस्त प्लॅन आणि चांगली सेवेमुळे या सरकारी टेलिकॉम कंपनीकडे वळले आहे.यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
आता नुकतेच बीएसएनएल धमाकेदार असा 100 रुपये पेक्षा अगदी स्वस्त नवा रिचार्ज प्लान आणला आहे.जो अमर्यादित कॉलिंग सुविधा देतो.BSNL आपल्या वापरकर्त्यांना अनेक स्वस्त योजना ऑफर करीत असताना हा खूप स्वस्त प्लान मानला जात आहे. कंपनीचा 100 रुपयांचा कमी किमतीचा प्लॅन आहे.
BSNL 100 Rs Recharge Plan : हा आहे BSNL चा 99 रुपयांचा रिचार्ज प्लान.
BSNL ने नुकताच 99 रुपयांचा हा रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे, यात Bsnl Sim युजर्स हवे तितके अनलिमिटेड कॉल्स करू शकतात.या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. फक्त एकदा रिचार्ज केल्यानंतर, वापरकर्ते देशभरातील कोणत्याही मोबाइल नंबरवर विनामूल्य कॉल करू शकतात.
या दरम्यान रोमिंग किंवा एसटीडीची STDD ची काळजी करण्याचीही गरज नाही. BSNL चा हा प्लान 17 दिवसांच्या वैधता देतो.वापरकर्ते एकूण 17 दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय विनामूल्य कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात.या प्लॅनमध्ये इतर कोणताही डाटा आणि सबस्क्रिप्शन लाभ दिला जात नाही.
ज्यांना एसएमएस किंवा डेटाची गरज नाही त्यांच्यासाठी हा प्लान खूप सुविधाजनक आहे.देशात अजूनही फक्त व्हॉईस कॉल्स वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे बीएसएनएल हा आकर्षक प्लान सादर केला आहे.
बीएसएनएल चा नवा व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज प्लान.
ट्रायच्या TRAI.आदेशानंतर देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि एसएमएस योजना सुरू केल्या होत्या. ताईने सर्व टेलिकामु कंपन्यांना व्हाईस ओन्ली प्लॅन सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे फक्त व्हाईस कॉलिंग साठी कंपन्यांनी विविध सादर केली आहे,यात आता, बीएसएनएलनेही एक नवीन प्लॅन आणला आहे.
यात Bsnl कंपनी 439 रुपयांच्या व्हॉइस आणि एसएमएस प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता देत आहे. या 90 दिवसांमध्ये वापरकर्त्यांना Bsnl Sim Users.अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस ऑफर केले आहे. हा नवा प्लॅन व्हॉईस आणि एसएमएस पॅक आहे. यामध्ये कोणताही इंटरनेट डेटा किंवा इतर कोणताही फायदा उपलब्ध नाही.जर BSNL ने आणलेल्या या प्लांन्सची त्याची तुलना इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या योजनांशी केली तर हे अगदी खूपच स्वस्त आहे.