Electoral Roll: मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम.

Electoral Roll: मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम.

Electoral Roll: तालुका प्रतिनिधी घाटंजी: दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय सभागृह घाटंजी येथे मा. याशनी नागराजन उपविभागीय अधिकारी केळापूर तथा मतदार नोंदणी अधिकारी 80 आर्णी वि.स.म.सं. यांचे अध्यक्षतेखाली केळापूर, घाटंजी व आर्णी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षकांची सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करणे, मतदार यादीतून मय्यत व्यक्तीचे, कायम स्वरुपी स्थलांतरित व्यक्तीचे नावाचा शोध घेवून नमुना 7 भरणे, अंगणवाडी सेविका.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

आशा वर्कर्स व रास्त भाव दुकानदार यांचेकडील कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर व डी वन रजिस्टर वरुन नावाची पडताळणी करुन सुटलेले नाव मतदार यादीत समाविष्ट करणेकरीता नमुना 6 भरणे, मतदार यादीतील घर क्रमांकासमोरील क्रमांकांची दुरुस्ती करणेकरीता नमुना 8 भरणे तसेच मतदार यादी वाचनाचे इतिवृत्त लिहणे आणि आढळून येणाऱ्या त्रुटीची पुर्तता करणे इत्यादीबद्दल मा. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 80 आर्णी वि.स.म.सं. यांचेकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रस्तरीय मतदान प्रतिनिधीची (BLA) यादी विनाविलंब पुरविण्याचे आवाहन करण्यात आले. सदर सभेकरीता तहसिल कार्यालय घाटंजीचे निवडणूक नायब तहसिलदार दिलीप राठोड, नायब तहसिलदार संजय होटे, केळापूर तहसिल चे नायब तहसिलदार लहू चांदेकर, आर्णी तहसिलचे नायब तहसिलदार संतोष आदमुलवार हजर होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 14 =