BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार?

BJP Operation Lotus in Maharashtra : महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस च्या ट्रॅपमध्ये अडकणार ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर आता भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या या नवीन खेळीकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.महाविकास आघाडीचे खासदार भाजपच्या ऑपरेशन लोटस मध्ये अडकणार की, महाविकास आघाडीचे नेते लवकर डॅमेज कंट्रोल करणार?हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.मात्र भाजपच्या या नवीन राजकीय खेळीची शक्यता पाहता महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश प्राप्त केले आहे,मात्र यापूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आणि त्यात विशिष्ट काँग्रेसने मोठा धक्का दिला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर विजय मिळाला होता,त्यात भाजपचे 28 पैकी फक्त नऊ खासदार निवडून आले होते. महाविकास आघाडीला 31 जागांवर विजय मिळाला होता यात सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. त्यामुळे भाजपसाठी महाराष्ट्रात हा मोठा राजकीय धक्का होता. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपचा अबकी बार चार सौ पार हा स्वप्न भंगला होता.

केंद्रात चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या मदतीने भाजपला सत्ता मिळवावी लागली. तर दुसरीकडे देशात केंद्रातील वेळोवेळी गठबंधन सरकार बनुन ते अनेकवेळा यशस्वी न होण्याचा इतिहास आहे.त्यामुळे आता केंद्रात भाजप आपले पाय मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे खासदार फोडण्याच्या तयारीत आहे.त्यासाठी भाजप ऑपरेशन लोटस च्या माध्यमातून विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या तंबूत घेण्याची तयारीत आहे.यात महाराष्ट्राचे महाविकास आघाडीतील अनेक खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. अशी माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे तर दुसरीकडे या संबंधात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही चर्चा होताना दिसत आहे.

संभाव्य भाजप ऑपरेशन लोटस मध्ये एनसीपी शरद पवार पक्षाचे खासदार भाजपच्या संपर्कात ?

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने यश मिळवून सत्ता स्थापित केल्यानंतर आता भाजप महाविकास आघाडीमध्ये पुन्हा राजकीय भूकंप निर्माण करण्यासाठी ऑपरेशन लोटस ची तयारी करीत असल्याचे चित्र आहे.नुकतेच राज्यातील भाजपमधील सक्रिय असलेल्या मोठ्या नेत्यांच्या सूत्रांनी समोर आणलेल्या माहितीनुसार विधानसभेत मोठा पराभव पत्करणाऱ्या महाविकास आघाडी मधील काही खासदार भाजपच्या संपर्कात आलेले आहे.आणि ते लवकरच आपल्या खासदार पदाचा राजीनामा देऊ शकतात ही शक्यता आहे.यामुळेच महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन लोटस राबवित असल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू झाली आहे.यादरम्यान मविआ मध्ये असलेले राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांची अशी मोठी संख्या आहे जे भाजपच्या नेत्याच्या संपर्कात आहे,असा दावा भाजपचे राजकीय सूत्र करीत आहे.मंगळवार आणि बुधवारी महाराष्ट्रात या मुद्द्यावर राजकीय चर्चा रंगतानाही दिसत आहे.त्यामुळे लवकरच भाजपच्या नवीन राजकीय खेळीमुळे राजकारणात खळबळ आणि महाविकास आघाडीमध्ये भूकंप येणार असल्याची शक्यता निर्माण झालेली दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

sixteen + 16 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.