*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर*
भाजपा ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा उपाध्यक्ष पदी नरसी येथील पत्रकार गोविंद रामराव नरसीकर(टोकलवाड)यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हानमंत पाटील नरोटे यांनी आज भाजपा ओबीसी मोर्चा ची जिल्ह्य़ाची कार्यकारिणी जाहीर केली.
उपाध्यक्षपदी नायगाव तालुक्यातील नरसी येथील पञकार गोविंद नरसीकर (टोकलवाड) यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे,पं.स.सदस्या प्रतिभाताई पाटील धानोरकर, जेष्ठ पत्रकार सुर्यकांत दादा सोनखेडकर, संजय बुडकेवार, प्रल्हाद कांबळे,रमेश ठाकूर, प्रभाकर लखपत्रेवार, मनोहर तेलंग, गंगाधर भिलवंडे.
सुभाष पेरकेवार, आनंदराव सुर्यवंशी, सय्यद जाफर, पंडीत वाघमारे, गजानन चौधरी, गंगाधर गगासागरे,लक्ष्मण बरगे, तानाजी शेळगावकर, गणेश कंदुरके, बालाजीराव नरवाडे दरेगावकर, ओम पाटील धानोरकर, गजानन पाटील काडांळकर, पञकार निळकंठ जाधव, श्याम पाटील चोंडे, माधव चिंतले, दिगांबर भिलवंडे, सुरेश बट्टेवाड सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.