BJP Mission 272 In Maharashtra : काय आहे भाजपचे महाराष्ट्रात “मिशन 272” ?

BJP Mission 272 In Maharashtra : भारतीय जनता पार्टी कडून महाराष्ट्रात नवीन राजकीय ऑपरेशन सुरू करण्यात आली आहे यात भाजपने 272 खासदार जमविण्याचा मिशन फिक्स केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने केंद्रासाठी एकूण 272 खासदारांचा नवीन टार्गेट ठेवला आहे. पण याची गरज भाजपाला का पडत आहे कारण केंद्रात असलेल्या एनडीए प्रणित भाजपला बहुमत आहे त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात ही संख्या पूर्ण करण्यासाठी हे मिशन का सुरू ठेवले आहे हे आपण यातून जाणून घेवू या…

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात राजकीय आणि आमदार खासदारांच्या फळाफळीचे संकेत मिळत आहे तर दुसरीकडे हे दोन्ही पक्ष या गोष्टींना नाकारत असल्याने काका पुतण्यांचे पुन्हा राजकीय मनोमिलन होणार असल्याची चर्चा आहे. बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही खासदारांना कॉल करून त्यांना आपल्या तंबूत येण्याचे निमंत्रण दिल्याचा आरोप प शरद पवार गटाकडून झालेला आहे हे आरोप शरद पवारांचे खास शिलेदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खांद्यावर राजकीय बंदूक ठेवून भाजप खासदार फोडण्याचा निशाणाचा साधत नाही ना असा सवाल निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या दरम्यानच महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन “टू सेवन टू” राबवित असल्याची चर्चा गुरुवारी सुरू झाली. त्यामुळे भाजपचा समोरचा केंद्रासाठी गेम प्लॅन काय आहे?एन डी ए फुटण्याचा भाजप समोर खतरा तर निर्माण झाला नाही ना? असे प्रश्नही निर्माण झाले आहे.

नितीश कुमार यांच्यामुळे भाजपचा नवा राजकीय खेळ.

मागील काही दिवसांपासून बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि सध्या एनडीए मध्ये असलेले नितीश कुमार यांच्यात राजकीय मनोमिलन होऊन सरकारी स्थापित होऊ शकते अशी चर्चा आहे असे झाले तर केंद्रात भाजप समोर नितेश कुमार हे एनडीएतून बाहेर पडण्याचा धोका आहे? त्यामुळे भाजपने नितेश कुमार यांना आवरण्यासाठी आणि केंद्रात भाजपला बहुमतासाठी खासदारांची आवश्यक संख्या 272 अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात खासदारांसाठी नवीन मिशन उघडण्याची पाळी आली आहे अशी चर्चा होत आहे.

एनडीए मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे खासदार सामील होऊ शकतात अशा चर्चा मुद्दामहून सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे नितेश कुमार हे आवरतील असा भाजपचा कयास आहे. यामुळेच अजित पवार यांच्या गोटातून शरद पवार यांच्या खासदारांना फोन लावण्यात येत आहे. दरम्यान या बाबींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी अजित पवार गोटात असलेले खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे व्यक्त केलेली आहे.

मात्र हा राजकीय दिखावा असू शकते अशी शक्यता आहे. मात्र भाजपने अजित पवार यांचा पक्ष एनडीए मध्ये असताना सुद्धा अद्यापही केंद्रीय मंत्रीपद दिले नाही.त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्रात शरद पवार पक्षाचे खासदार तुटत नाही,तोपर्यंत केंद्रात राष्ट्रवादीला मंत्री पद मिळणार नाही,अशी अट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस समोर ठेवली आहे,असा सनसनाटी दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवार गटाचे किमान 7 खासदार फोडण्याचे लक्ष हे भाजपने या पक्षाकरवी ठेवल्याची माहिती विश्वसनीय राजकीय सुत्रांकडून समोर आलेली आहे.

नितेश कुमार चंद्राबाबू नायडू यांच्या वरील निर्भरता कमी करण्याचे डाव?

केंद्रातील राजकीय घडामोडीत सध्या भाजपच्या ऑपरेशन 272 ची चर्चा सुरू आहे. कारण केंद्रात भाजपकडे फक्त 240 खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीए मध्ये असलेले नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपदी विराजमान तर झाले पण भाजपला अल्पमताचा डर सुरुवातीपासूनच आहे.

कारण नितेश कुमार हे राजकीय स्तरावर आपल्या परीने सरकार बनविणे किंवा पाडणे यासाठी”पलटू चाचा” म्हणून विख्यात आहे.सध्या केंद्रात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचे एकूण 28 खासदारांच्या पाठिंबावर एनडीए सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्भर आहेत.हीच मोठी सल भाजपला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवरील निर्भरता बाजूला ठेवण्यासाठी,आता भाजप नवीन असा 272 खासदारांचा प्लॅनिंग करीत आहे.

महाराष्ट्रात दुतर्फी राजकीय खेळी.

यात भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदार आपल्या तंबूत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.एक तर सरळ केंद्रातील सत्तेत सामील व्हा, असे ऑफर आतील गोटात दिले जात आहे,तर दुसरीकडे अजित पवार यांच्या माध्यमातून खासदार फोडण्यासाठी महाराष्ट्रात दुसरे मिशन हे भाजपच्या इशाऱ्यावर सुरू केल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील खासदारांची एकत्रित मोट बांधणार किंवा एक तृतीयांश खासदार तरी फोडणार?.

महाराष्ट्रात भाजपची नजर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदारांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला आणि महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपची केंद्रासाठी आवश्यक खासदारांची संख्या महाराष्ट्रातून पूर्ण होऊ शकते, अशी भाजपला आशा आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व खासदारांची एकत्रित मोट बांधण्यासाठी किंवा या 17 पैकी एक तृतीयांश खासदार फोडण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात हा मिशन फिक्स केल्याचे बोलले जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twelve − ten =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.