BJP Maharashtra Vidhansabha 2024 : विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार का ? तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात,जाणून घ्या काय आहे परिस्थिती.

BJP Maharashtra Vidhansabha 2024 : विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार का ? तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात,जाणून घ्या काय आहे परिस्थिती.

BJP Maharashtra Vidhansabha 2024 : विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार का ? तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात,जाणून घ्या काय आहे परिस्थिती.

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला यंदा निवडणुकीत सपाटून फटका बसणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप 105 पैकी अनेक जागा गमावत आहे.विशेष म्हणजे भाजपच्या आतील गोटातून ही माहिती समोर आली आहे. नुकतीच मुंबई येथे भाजप कोर कमिटीच्या बैठकीत ही माहिती समोर आली आहे की भाजप यंदाच्या निवडणुकीत 85 जागा जिंकू शकते या बैठकीत राज्यात मागील विधानसभेत भाजपने जिंकलेल्या 105 जागांचा आढावा घेण्यात आला.त्यात 85 जागा जिंकत असून 25 जागा धोक्यात असल्याचा हा निष्कर्ष समोर ठेवण्यात आला.

लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप सक्रिय.

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप जागांचा मोठा नुकसान झाला. फक्त आठ लोकसभा सीट्स भाजपला जिंकता आल्या,त्यामुळे अलर्ट मोड मध्ये आलेल्या भाजप हाय कमांडने लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी नवीन समीकरण आणि रणनीती अन् आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपकडून राज्यात जिल्हावार बैठका सुरू झाले आहेत.अशीच एक बैठक मुंबईत झाली.यात 2019 च्या निवडणुकीचा आणि 105 जागांचा आढावा घेण्यात आला.भाजप महाराष्ट्रात यंदा 85 जागा जिंकत असल्याचा विश्वासही यावेळी दर्शविण्यात आला.

राज्यात भाजपला 25 जागांवर धोखा.

भटकी नंतर सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती समोर आली त्यात भाजपसाठी धोक्याची घंटा वाजताना दिसत आहे.राज्यात यंदा भाजपच्या 25 मतदार संघात जागा धोक्यात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात सावध पवित्रा घेऊन अतिरिक्त मेहनत घेण्याचा सल्ला नेत्यांनी बैठकीत दिला. तर दुसरीकडे नुकतीच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक या निमित्ताने झाल्याची माहितीही समोर आली आहे.या बैठकीत धोक्यात आलेल्या जागा यातून बाहेर कसे काढता येईल,यासाठी संघ आणि भाजपच्या लोकांनी चर्चा सुरू केली आहे. विशेष म्हणजे 2014 ला विधानसभा निवडणुकीत भाजपने 122 जिंकल्या.यानंतर ह्या जागा कमी झाल्या.2019 मध्ये भाजप 105 जागांवर आली.मात्र आता 105 पैकी 85 जागांवर विजयाची खात्री आणि 25 जागा धोक्यात आल्याने राज्यात भाजपसाठी हा चिंतेचा मुद्दा झाला आहे.त्यामुळे भाजप नेते,हाय कमांड अन् संपूर्ण पक्ष कमजोर मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्यासाठी परिश्रम घेताना दिसत आहे.

मिशन 125 : 85 जागांवर लक्ष.

विधानसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात महायुतीत राहून 125 जिंकण्याचे मिशन सेट करून लक्ष निर्धारित केले आहे मात्र नुकतीच भाजपची जी महत्त्वाची बैठक झाली त्यात आधीच्या जिंकलेल्या जागा कमी होत असल्याने आता अतिरिक्त 25 जागांवर भाजप नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.या जागा कोणत्याही हालतीत जिंकायच्या यासाठी रणनीती आणण्यात आली आहे 25 जागा धोक्यात असल्याने आणि 85 जागा जिंकण्याची खात्री असल्याने पक्षाने सर्व जागांना वर्गवारी मध्ये मोडून या ठिकाणी भाजपने लक्ष देणे सुरू केले आहे. ज्या 85 जागा जिंकण्याचा भाजप विश्वास दाखवत आहेत त्यामध्ये सहा ते सात असे मतदारसंघ आहेत ज्यात भाजपचे उमेदवार खूप कमी मताधिक्यांनी जिंकले होते या जागांवर ही भाजप लक्ष देत आहेत.

सोबतच मागील विधानसभेत हरलेल्या सहा जागा पुन्हा जिंकू शकतात असा विश्वास भाजप पक्ष श्रेष्ठींनी दाखविला आहे.आता वरील सर्व जागांचा आढावा घेत भाजपकडून मागील तीन विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी झालेlys मतदानाचा अवलोकन केला जात आहे.तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या बूथमधून पक्षाला झालेले मतदान आणि येणाऱ्या विधानसभेत किती मतदान भाजपच्या पथ्यात पडू शकते याचे आडाखे बांधणेही सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 16 =