Birth Certificate Online Process : आता घरबसल्या प्राप्त करून घ्या जन्म दाखला.जाणून घ्या, ऑनलाइन प्रक्रिया !

Birth Certificate Online Process : सर्व नागरिकांसाठी आपल्या जन्माचा दाखला महत्त्वाचा असतो.प्रशासनिक स्तरावर जन्म दाखला देण्यात येते आता घरबसल्याही आपल्या मोबाईल वरूनच ऑनलाइन जन्म दाखला काढता येणार आहे.(Online Birth Certificate Process) ऑनलाइन पद्धतीने हा जन्माचा दाखला मिळणार असून याचा आपण कसा उपयोग करतो,याप्रमाणे यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.जन्माचा दाखला घरबसल्या मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, आणि मोबाईलवर यासाठी कसा अर्ज करावा लागतो,आणि यानंतर हा दाखला कसा मिळेल, याची माहिती आपण या माध्यमातून पाहून घेणार आहोत…

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बर्थ सर्टिफिकेटची गरज असते.{Birth Certificate}उल्लेखनीय म्हणजे जन्माच्या दाखल्यात व्यक्तीचे जन्म ठिकाण,अचूक जन्मतारीख, वेळ,आणि आई-वडिलांचा तपशील नमूद असते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

त्यामुळे एका प्रकारे हा शासकीय कागदपत्र आहे,जे प्रत्येक नागरिकाकडे असणे आवश्यक आहे.जन्माचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे.शाळेत प्रवेश घेताना जन्माचा दाखला त्या विद्यार्थ्यांसाठी मजबूत पुरावा असतो,याच्या आधारेच शाळेत प्रवेश मिळतो.

जन्म दाखला पुराव्याचा वापर करून वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळतो,आणि इतर व्यक्तिगत बाबींसाठी हा कामी येतो.याच्या आधारावर आपण इतर व्यक्तिगत प्रमाणपत्र आणि महत्त्वाचे दस्तावेज बनवू शकतो.{Birth Certificate Utility}

सर्व शासकीय कामकाज आणि शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी जन्म दाखला हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो,.मुलाच्या शाळेत ऍडमिशन ते पुढे अनेक कामासाठी जन्माचा दाखला महत्त्वाचा असतो. आधार कार्ड,पॅन कार्ड, मतदान कार्ड,रेशन कार्ड,सारखाच जन्माचा दाखला हा महत्त्वाचा कागदपत्र आहे.

हे एका प्रकारे व्यक्तीचे प्रमाणपत्र असते. विविध प्रकारच्या शासकीय आणि निम शासकीय आणि खाजगी कामांमध्ये याचा वापर होतो.
जन्माच्या दाखल्याच्या आधारावरच आधार कार्ड देण्यात येते.{Birth Certificate Are Individual ID}

त्यामुळे हा महत्त्वाचा दस्तावेज घरबसल्या कसे काढावे यासाठी प्रक्रिया आहे ती काय आहे ते पाहून घेऊया.

एखाद्या मुलाचा जन्म झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत जन्म दाखला काढून घेणे आवश्यक असते.एखाद्या शासकीय किंवा खाजगी प्रसूती इस्पितळात मुलाचा जन्म झाल्यास,त्या हॉस्पिटलचे मुलांचे जन्म संबंधी रेकॉर्ड नगरपरिषदेमध्ये किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायत नगरपंचायत कडे सादर करण्याची प्रक्रिया नियमित होत असते.

हॉस्पिटलमध्ये मुलाचा जन्म झाल्यास त्याची जन्मतारीख आणि आई-वडिलांचा तपशील जन्म रेकॉर्ड फॉरमॅटमध्ये नमूद केला जातो हा रेकॉर्ड हॉस्पिटलमध्ये आणि नगरपरिषद मध्ये किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राहते.

दरम्यान आता जन्म दाखला काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे शासकीय स्तरावर प्रक्रिया होत आहे.आधुनिक आणि ऑनलाइन कॉम्प्युटर सिस्टममुळे मागील अनेक वर्षातील जन्म रिकॉर्ड हे महानगरपालिका,नगरपरिषद नगरपंचायत,ग्रामपंचायत मार्फत आपल्या प्रशासनिक स्तरावर जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या कामासाठी अपडेट केल्या जाते.

Birth Certificate Online Process : ही आहे जन्म दाखला काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया

जन्म दाखला काढण्याची गरज असल्यास यासाठी शासकीय अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध आहे.यासाठी आपला जन्म दाखला रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.ऑनलाइन हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर येथे युजर आयडी आणि एक पासवर्ड दिला जातो. हे मिळाल्यानंतर पुन्हा या वेबसाईटवर लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी लागते.

  • या वेबसाईटवर Birth हे ऑप्शन वर क्लिक करून ऍड बर्थ रजिस्ट्रेशन या पर्याय हा पर्याय सिलेक्ट करा.
  • यानंतर जन्म दाखला तपशील साठी याचा फॉर्म उघडेल.
  • या फॉर्ममध्ये फॉर्मेट मध्ये दिलेली माहिती जसे की,
  • मुलाचे नाव.
  • अचूक जन्मतारीख.
  • पूर्ण पत्ता.
  • वडिलांचे नाव.
  • आईचे नाव.नमूद करावे लागेल,यानंतर हा फॉर्म सेव होतो.
  • ऑनलाइनरित्या हा फॉर्म सेव झाल्यानंतर जन्मदाखल्यासाठी केलेल्या अर्जाची पावती मिळेल.
  • अर्ज सबमिट झाला की, याच्यानंतर एका आठवड्यात शासनअधिकृत जन्म दाखला दिल्या जातो.

आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन जन्म दाखला अर्ज आणि जन्म दाखला घेण्यासाठी खालील दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अधिकृत शासकीय वेबसाईटची
लिंक क्लिक करून माहिती,आणि यासाठी अर्ज करता येते.

https://services.india.gov.in/service/detail/apply-for-birth-certificate-maharashtra

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2476

अशी करा ऑफलाइन प्रोसेस

जन्म दाखला प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन हे दोन्ही पर्याय आता उपलब्ध आहे. जर ऑफलाइन जन्म दाखला हवा असल्यास, यासाठी नगरपरिषद,महानगरपालिका, नगरपालिका,ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये जन्म दाखल्याचा फॉर्म उपलब्ध असतो.

तो फॉर्म अचूक भरून आणि यासाठी लागणारे हॉस्पिटलचे जन्म रेकॉर्ड आणि इतर व्यक्तिगत आवश्यक कागदपत्रे जोडून भरलेला फॉर्म या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जन्म मृत्यू दाखला विभागात जमा करावा लागतो.यानुसार ऑफलाईन अर्ज सबमिट होते.

  • हे लागतात कागदपत्रे.

  • जन्म दाखला हवा असल्यास जन्माचे ठिकाण दर्शविणारा पुरावा यात
  • रुग्णालयाचे जन्म रेकॉर्ड.
  • तेथील रिसिप्ट.
  • पालकाचे ओळखपत्र.
  • पालकांचे मॅरेज सर्टिफिकेट लागतात.
  • यात मॅरेज सर्टिफिकेट हा पर्यायी असते.

जर जन्म नोंदणी उशीर झाला तर ही कागदपत्रे आवश्यक.

जर जन्म दाखला काढण्यास उशीर झाल्यास आणि जन्म दाखला आवश्यक असल्यास,अर्जदाराचे ओळखपत्र,शाळा सोडल्याचा दाखला,आई-वडिलांचे ओळखपत्र,जेथे जन्म झाला त्या रुग्णालयाचे जन्म रेकॉर्ड प्रमाणपत्र, जर जन्म हॉस्पिटलमध्ये झाला नसल्यास यासाठी संबंधित अर्जदाराचे पालकांचे शपथपत्र द्यावे लागते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen + eleven =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.